काही पक्षांचे भान सुटत चालले- अजितदादांचा टोला
काही राजकीय पक्षांचे भान सुटत चालले आहे... निवडणुका जवळ आल्यामुळं जनतेच्या प्रश्नांची जाणिव झाली असावी असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना मारला आहे...
Feb 12, 2014, 04:22 PM ISTआज, महाराष्ट्रभर हाय-वे बंद करणार
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे सांगितले.
Feb 11, 2014, 06:51 PM ISTनारायण राणे नाराज, काँग्रेसमध्ये माझा `सेवादल`
काँग्रेसमध्ये आपणाला डावलले जात असल्याची खंत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखवलीय. ठाण्यामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस माझाही सेवादल करण्याच्या बेतात आहे... पण तरीही मी गप्प बसणार नाही. माझ्यावर राख साचू देणार नाही. निखारा हा निखाराच राहिला पाहिजे, असे राणेंनी यावेळी स्पष्ट केलं.
Feb 11, 2014, 08:24 AM ISTराष्ट्रवादीच्या `जेरी`नं आणलं `टॉम`ला जेरीस!
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटलाय. दोन्ही पक्षांनी २६-२२ फॉर्म्युलावर एकमतानं शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलंय.
Feb 10, 2014, 07:54 PM IST`टॉम अॅण्ड जेरी`चा तंटा चर्चेनं सुटेल का?
प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपासाठी `टॉम अॅण्ड जेरी`सारखे भांडणारे, काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण आज तरी चर्चेनं सुटेल का?, असा सवाल उपस्थित होतो.
Feb 10, 2014, 04:24 PM ISTRSS ही विषारी विचारधारा, राहुल गांधींचा घणाघात
आरएसएस ही विषारी विचारधारा आहे... आणि या विचारधारेनंच गांधीजींची हत्या केली, असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींची आज मोदींच्या गुजरातमध्ये बारडोलीत सभा झाली. त्यात ते बोलत होते.
Feb 8, 2014, 02:50 PM ISTकेंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची ३ कोटींची अजब मागणी
केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड परत करण्याची तयारी दर्शवलीय. मुख्यमंत्री कार्यालयातूनच आज हा खुलासा करण्यात आलाय. आपलं राजकीय वजन वापरून घेतलेली जमीन वाद निर्माण झाल्यानंतर परत करण्याचं औदार्य केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी दाखवलं खरं... मात्र एक लाखात घेतलेली ही जमीन परत करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडेच ३ कोटी रुपयांची मागणी केलीये.
Feb 7, 2014, 09:07 PM ISTराष्ट्रवादीचा विजयी होणाऱ्या जागांवर डोळा?
लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पद्धतशीरपणे योजना आखलीय. त्यासाठी सुरक्षित आणि विजयाची खात्री असणारेच मतदारसंघ आपल्या पारड्यात पाडून घेतले जातायत. कोकणातल्या रायगड मतदार संघावरही राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे संकेत मिळतायत.
Feb 7, 2014, 08:32 PM ISTअसीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, बसपा, जेडीयू
असीमानंद यांच्या आरोपानंतर काँग्रेस, बसपा आणि जेडीयू या तीन्ही पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.
Feb 6, 2014, 06:23 PM ISTकाँग्रेसच्या घराणेशाहीचा प्रणवदांना फटका - मोदी
इंदिरा गांधींच्या निधनानंतर प्रणव मुखर्जी हेच पंतप्रधान पदाचे खरे दावेदार होते. मात्र, घराणेशाहीमुळे त्यांना संधी मिळाली नसल्याचं सांगत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली.
Feb 6, 2014, 09:43 AM ISTआजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
पंधराव्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन आजपासून सुरू होतंय. पंधरावी लोकसभा ही सगळ्यातं गोंधळी लोकसभा असल्याचं एव्हाना सर्वांनाच माहित झालंय. अनेक महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनासमोर आहेत. पण आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती ह्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन कामकाज न होता वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
Feb 5, 2014, 09:49 AM ISTकसं तुटलं शिवबंधन? वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर?
शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे.
Feb 4, 2014, 04:25 PM ISTराष्ट्रावादीचा निर्वाणीचा इशारा, काँग्रेसची धावाधाव सुरू
राष्ट्रावादीनं जागावाटपासंदर्भात निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर काँग्रेसची धावाधाव सुरू झालीय. याचपार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची पहिली बैठक दिल्लीत झाली.
Feb 2, 2014, 11:50 PM ISTकाँग्रेस सर्वात जास्त विषारी - नरेंद्र मोदी
काँग्रेस पक्ष सर्वात जास्त विषारी असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी यापूर्वी काही लोक विषाची शेती करतात अशी टीका केली होती. या टीकेला नरेंद्र मोदी यांनी आज मेरठच्या सभेत उत्तर दिलं आहे.
Feb 2, 2014, 04:22 PM ISTविषाची शेती करणाऱ्यांना सत्ता देऊ नका - सोनिया
विषाची शेती करणाऱ्या आणि विभाजनाचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती सत्ता देऊ नका, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी केलंय. कर्नाटकमधल्या गुलबर्ग्यात झालेल्या रॅलीमध्ये त्या बोलत होत्या. नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांनी मोदींवर आणि भाजपवर कडाडून टीका केली.
Feb 1, 2014, 11:05 PM IST