‘रिलायन्स’वर मेहेरबानी का?
ठाण्याच्या किसन नगर भागात महापालिकेची परवानगी न घेता रस्ते खोदून रिलायन्स कंपनीकडून केबल टाकण्यात येतेय. पण रिलायन्सच्या ठेकेदारांचं काम काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी बंद पाडलं. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर याची चौकशी करून कारवाई करू, असं उत्तर पालिकेकडून देण्यात आलं.
Dec 12, 2013, 08:04 PM ISTकाँग्रेसच्या पोस्टर्सवर कलमाडींच्या फोटोला आक्षेप; वाद विकोपाला
खासदार सुरेश कलमाडी आणि माजी उप-महापौर दीपक मानकर यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. काँग्रेस भवन आणि काँग्रेसच्या गट नेत्यांच्या महापालिकेतल्या दालनात कलमाडींचे फोटो आजही दिमाखाने झळकतायत.
Dec 11, 2013, 10:08 PM IST`आप`चे आमदार अडचणीत, विनयभंगाचा गुन्हा
एक वर्षभरात राजकीय जादू करीत दिल्लीत आपले अस्तित्व दाखवून देशात चर्चेत राहणाऱ्या आम आदमी पार्टी अर्थात आपने अनेकांना चिंतन करायला लावले. याच आपचे नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्रसिंग कोली यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आपचे आमदार अडचणीत आलेय.
Dec 11, 2013, 10:02 AM ISTपाच राज्यांतील विधानसभेत काँग्रेसला केवळ `ठेंगा`!
आज झालेल्या मतमोजणीनुसार, ४० पैकी २१ जागांचा बहुमताचा आकडा पार करून काँग्रेसनं मिझोरममध्ये विजयाची नोंद केलीय.
Dec 9, 2013, 05:03 PM IST‘भाजप’च्या ‘जादू’चा राज्य हिवाळी अधिवेशनावर परिणाम?
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु होतंय. नेल्सन मंडेला यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे.
Dec 9, 2013, 12:09 PM ISTछत्तीसगडमध्येही भाजपची विजयाची हॅट्ट्रीक!
अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या छत्तीसगडमध्ये अखेर भाजपचीच सत्ता आलीय. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सत्तेची हॅटट्रीक केलीय. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभा असलेल्या बस्तरनं यावेळी मात्र भाजपची साथ सोडली. छत्तीसगडमध्ये अपेक्षेप्रमाणं भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा चुरशीचा सामना भाजपनं जिंकला.
Dec 9, 2013, 08:26 AM ISTपक्षाला आत्मचिंतनाची गरज, सोनियांची कबुली
विधानसभा निवडणुकीतला पराभव मान्य करत पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं मत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं.
Dec 9, 2013, 08:10 AM ISTपंतप्रधानपदाचा उमेदवार पक्ष ठरवेल- सोनिया
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. तरीही चार राज्यांमधील निकाल म्हणजे आमच्यासाठी जनतेने दिलेल्या सूचनाच आहेत. पराभवामुळे निराश नक्कीच आहोत; पण हा निकाल आम्ही स्वीकारत आहोत, अशा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पराभव स्वीकारला आहे.
Dec 8, 2013, 07:09 PM ISTपराभवानंतर काँग्रेसला राष्ट्रवादीने काढला चिमटा
मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्र पक्ष काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी दिला आहे.
Dec 8, 2013, 07:09 PM ISTभ्रष्टाचारामुळे काँग्रेसचा पराभव - रामदेव बाबा
काँग्रेसचं भ्रष्ट राजकारण आणि राहुल गांधी यांच्यामुळे निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, अशी टीका रामदेव बाबा यांनी केली आहे. चुकीच्या धोरणांमुळे जनतेनं काँग्रेसला नाकारलं, असं रामदेव बाबा म्हणालेत.
Dec 8, 2013, 04:33 PM ISTदिल्लीत काँग्रेसला `आम आदमी`चा हिसका
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपची `झाडू`च कारणीभूत ठरली.
Dec 8, 2013, 04:00 PM ISTमोंदीमुळे विजय मात्र, श्रेय जनतेला - वसुंधरा राजे
राजस्थाळनमध्ये आपली गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यात यश संपादन केले आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार बाजी मारत सत्ता खेचून आणली आहे. हा विजय नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाल्याचे सांगत भाजप मुख्यथमंत्री पदाच्या दावेदार वसुंधरा राजे यांनी राज्याआतील विजयाचे श्रेय जनतेला समर्पित केले आहे. आपला जनतेवर पूर्वीपासून विश्वाास होता, असे त्यांरनी म्हदटले.
Dec 8, 2013, 01:02 PM IST‘आप’च्या धक्क्यानं शीला दीक्षितांचा राजीनामा!
चार राज्यांच्या मतमोजणीद्वारे धक्कादायक निकाल पुढे आले आहेत. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीत जोरदार मुसंडी मारलीय. आपच्या झाडूनं काँग्रेसचा जणू सफायाच केलाय. त्यामुळं आपला पराभव स्वीकारत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा दिलाय.
Dec 8, 2013, 12:07 PM ISTजनतेचा विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा - अण्णा हजारे
दिल्लीत काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालीय. नवी दिल्लीत गेल्या १५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात येणार हे स्पष्ट झालंय.
Dec 8, 2013, 12:02 PM ISTमध्य प्रदेशात पुन्हा भाजपला कौल, विजयाची हॅटट्रिक!
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने आपला करीष्मा दिसून आलाय. मतदारांनी भाजपलाच कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजयाची हॅटट्रिक भाजप साधणार असेच दिसतेय. १३४ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची बहुमताकडे सध्यातरी वाटचाल दिसून येत आहे.
Dec 8, 2013, 10:52 AM IST