congress

Rahul Bondre : सहकार क्षेत्रातील मोठी बातमी; काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सुतगिरणीवर जप्तीची कारवाई

25 कोटींच्या कर्जाच्या थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. वसुली पथकात बँकेचे 15 अधिकारी कर्मचारी असल्याचे समजते. बँकेच्या विशेष वसुली पथकाने ही कारवाई सुरु केल्याचे समजते. मात्र, बोंद्रे यांनी थकित कर्जातील काहीा रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे ही कारवाई टळू शकते अशी माहितीही समोर आली आहे. सध्या या सूतगिरणीमध्ये अनेक कामगार काम करत आहेत. 

Jan 13, 2023, 06:56 PM IST

Satyajit Tambe : कुणी लिहिली तांबेंच्या उमेदवारीची स्क्रिप्ट? काँग्रेसला कुणी बनवलं 'मामा'? फडवीसांनी गेम फिरवला

 काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे. 

Jan 13, 2023, 06:15 PM IST

आमदार सुनील केदार यांना अभियंत्याला मारहाण भोवली, एक वर्षाची जेल

Sunil Kedar: काँग्रेसचे आमदार सुनील केदार (MLA Sunil Kedar) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तर या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आमदार केदार यांच्या वकिलांनी दिली आहे.

Jan 13, 2023, 04:47 PM IST
Nana Patole's big indicative statement is that Congress will not support a rebel candidate PT6M28S

Video | तांबे कुटुंबियांनी काँग्रेससोबत धोका केलाय : नाना पटोले

Nana Patole's big indicative statement is that Congress will not support a rebel candidate

Jan 13, 2023, 01:30 PM IST

Nana Patole : सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, नाना पटोले म्हणाले - पुढचा निर्णय हायकमांड घेणार !

Nana Patole On BJP : भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यमय घडामोडीनंतर नाना पटोले यांनी दिली

Jan 13, 2023, 01:27 PM IST

Amit Deshmukh : भाजप प्रवेशाच्या चर्चा; विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य

भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil nilangekar) यांनी याबातचे वक्तव्य केले होते. लातूरचे प्रिन्सदेखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं निलंगेकरांनी म्हणाले राज्याचे राजकारण ढवळून निघाले. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर आपली जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 12, 2023, 11:18 PM IST