farmers

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांनी झाडे लावावी - योगी आदित्यनाथ

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 चा शुभारंभ केला. या दरम्यान त्यांनी यूपीमध्ये २२ कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. योगी बोलले की, कर्जमाफी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने झाडं लावणे अनिवार्य आहे.

Jun 5, 2017, 01:55 PM IST

शेतकरी संपाला हिंसक वळण, एसटीची तोडफोड

शेतकऱ्यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिसंक वळण लागले. शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील ५ एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या. 

Jun 5, 2017, 12:12 PM IST

शेतकरी आंदोलन पेटणार, पोलिसांचा लाठीचार्ज तर साताऱ्यात दगडफेक

 नांदगाव - चाळीसगांव रास्त्यावर जळगाव खुर्द येथे  शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या  शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे शेतकरी संपप्त झालेत. पोलिसांच्या निषेधार्थ  शेतकऱ्यांनी  रास्ता रोको  सुरु केला. याचे पडसात परिसरात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.  

Jun 5, 2017, 10:43 AM IST

अजित पवार यांची राज्य सरकारवर जोरदार टीका

 राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सुरु केलेला संप हे सरकारचं इतिहासातलं मोठं अपयश असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Jun 5, 2017, 08:28 AM IST

शेतकरी संप : मुंबई बाजार समितीमध्ये ९९७ गाडयांची आवक

शेतकऱ्यांची महाराष्ट्र बंदची हाक आणि शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशी सुरु असल्याने सर्वसामान्यांचे हाल सुरु झालेत.  

Jun 5, 2017, 08:09 AM IST

शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच, महाराष्ट्र बंदला प्रतिसाद

 शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच आहे. आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक गावांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय. काल नगर जिल्ह्यात संपाला पाठिंबा कायम ठेवत शेकडो लीटर दूध रस्त्यावर ओतलं. भाजीपालही फेकण्यात आला. 

Jun 5, 2017, 07:55 AM IST

शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबा

गेल्या चार दिवसांपासून शेतकरी संप सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. या बंदला खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला असताना आता शिवसेनेनेही आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.

Jun 4, 2017, 10:37 PM IST

शेतकरी संप, आज चौथ्या दिवशी ही सुरुच

शेतकरी संप आज चौथ्या दिवशी ही सुरुच आहे, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता,श्रीरामपुर,संगमनेर अकोले तालुक्यातील अनेक गावात बंद पाळण्यात येतोय. 

Jun 4, 2017, 01:17 PM IST