ipl 2024

'कोणीतरी धोनीला सांगण्याची गरज आहे की...', इरफान पठाण संतापला, 'कमाल आहे, तू किमान...'

IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने (Irfan Pathan) चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीवर (Mahendra Singh Dhoni) जोरदार टीका केली आहे. पंजाबविरोधातील (Punjab Kings) सामन्यात नवव्या क्रमांकावर खेळायला आल्याने इरफान पठाणने त्याला सुनावलं. 

 

May 6, 2024, 03:58 PM IST

सूर्यकुमार, ट्रेव्हिस हेड, क्लासेन... वानखेडेवर आज चौकार-षटकारांची बरसात, अशी असेल Playing XI

IPL 2024 MI Vs SRH Match Playing 11 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 55 वा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. याआधीच्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा पराभव केला होता.

May 6, 2024, 02:57 PM IST

'..तर धोनीला बाहेर बसवा, फास्ट बॉलर खेळवा'; धोनीच्या कॅप्टनशीपखाली खेळलेल्याचा सल्ला

IPL 2024 Make Dhoni Seat Outside Team CSK: धोनीवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना या क्रिकेटपटूने 'धोनीने सर्वांचीच निराशा केली,' असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे पूर्वी हा खेळाडू धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचा. त्यानेच आता धोनीला बाहेर बसवण्याचा सल्ला दिलाय.

May 6, 2024, 12:25 PM IST

'कोणीतरी धोनीला सांगायला हवं की, किमान...'; इरफान पठाण कॅप्टन कूलवर संतापला

Irfan Pathan Slams Dhoni: यंदाचं आयपीएल हे धोनीचं शेवटचं आयपीएल असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच संघाचं नेतृत्व यंदाच्या पर्वात ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. असं असतानाच आता इरफान धोनीवर संतापला आहे.

May 6, 2024, 11:08 AM IST

IPL 2024 : धोनीच्या आयपीएल निवृत्तीची वेळ जवळ आलीये का? इतिहासात पहिल्यांदा असं घडलं

MS Dhoni IPL retirement : आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स (PBKS vs CSK) हे दोघं संघ आमनेसामने भिडले होते, पण चेन्नई सुपर किंग्स फलंदाजी करत असताना ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी हा फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा असे काही घडले, जे क्रिकेट इतिहासात याआधी घडताना कोणीही पाहिले नसेल.

May 5, 2024, 11:05 PM IST

IPL 2024 : अंगात ताप असतानाही मैदानात उतरला सिराज; ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन नेमकं काय बोलला होता?

IPL 2024, GT vs RCB : आयपीएल 2024 च्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या समोर गुजरात टायटन्सचे आव्हान होते. तर या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे, या सामन्यात आरसीबीच्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आजारी असूनसुद्धा एकट्याच्या जोरावर आपल्या संघाला मॅच जिंकवून दिली आहे.  

May 5, 2024, 06:19 PM IST

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला 'जोर का झटका', हा स्टार गोलंदाज प्लेऑफच्या तोंडावर आयपीएलमधून बाहेर

Mathisha Pathirana returns to Sri Lanka :चेन्नई सुपर किंग्जला आता तिसरा धक्का बसला आहे. धोनीचा प्रमुख गोलंदाज बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे.

May 5, 2024, 05:34 PM IST

IPL 2024 : 'अरे तू उत्तर का देतोय...', विराट कोहली अन् सुनील गावस्कर यांच्या जोरदार खडाजंगी; पाहा Video

Sunil Gavaskar On Virat Kohli : विराट कोहलीचा स्ट्राईक रेट आणि वक्तव्य यावरून सध्या क्रिडाविश्वात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी विराटच्या टीकेवर उत्तर दिलंय.

May 5, 2024, 04:41 PM IST

अभि हम जिंदा है...! प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी', पाईंट्स टेबलची स्थिती पाहिली का?

RCB Playoffs Scenario : गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 4 गडी गमावून 152 धावा केल्या (RCB vs GT) अन् सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे आता प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीने मारुती उडी घेतली आहे.

May 4, 2024, 11:21 PM IST

MI vs KKR : लाईव्ह सामन्यात चढला हार्दिक पांड्याचा पारा, चूक नसताना बुमराहवर का भडकला? पाहा Video

Hardik Pandya Angry on jasprit bumrah : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र, सामन्यात पांड्याने असं काही केलं की, तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

May 4, 2024, 05:15 PM IST

Rohit Sharma: आयपीएलमध्ये रोहितने घेतला कठोर निर्णय? कोहली-बुमराह देखील ठेवणार का पावलावर पाऊल?

T20 World Cup: IPL 2024 च्या 51 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. हा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी खूप महत्त्वाचा होता. 

May 4, 2024, 09:35 AM IST

Mumbai Indians: हार्दिककडून पुन्हा टॉस फिक्सिंग? Live कॅमेरात कैद झाली पंड्याची चिटींग?

Mumbai Indians: हा चिटींगचा आरोप पुन्हा एकदा टॉसच्या मुद्द्यावरून झाल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी देखील पंड्यावर असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान केकेआर विरूद्धच्या सामन्यानंतर यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय.

May 4, 2024, 08:03 AM IST

MI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास'

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.

May 3, 2024, 11:20 PM IST

MI vs KKR : मुंबई इंडियन्सला रोहित शर्माची गरज उरली नाही का? वानखेडेवर पांड्याची 'चालाख खेळी'

MI vs KKR, IPL 2024 : कोलकाताविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ठेवलं. त्यामुळे गोलंदाजी करताना आता पांड्याला रोहितच्या (Rohit Sharma) मार्गदर्शनाची गरज उरली नाही का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.

May 3, 2024, 09:47 PM IST

मुंबई इंडियन्ससाठी 'करो या मरो', अशी असेल मुंबई आणि कोलकाताची प्लेईंग XI

IPL 2024 : आयपीएलच्या 51 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने असणार आहेत. दहापैकी सात सामन्यात पराभव पत्करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी करो या मरोचा सामना असणार आहे. 

May 3, 2024, 05:27 PM IST