kashmir

काश्मिरातील दहशदवाद्यांशी लढण्यासाठी निघाला १४ वर्षाचा मुलगा?

वसईचा एक १४ वर्षाचा मुलगा जम्मू-काश्मिरातील दहशदवादांविरोधात लढण्यासाठी घरातून निघाला. पण त्याचं हे स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलं. गुजरात पोलिसांनी त्याला तसं करण्यापासून रोखलं. १५ ऑगस्टला पुन्हा त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आलं.

Aug 19, 2016, 03:45 PM IST

काश्मीरवर नाही, तर दहशतवादावर चर्चा करा - भारत

काश्मीरवर नको, दहशतवादावर चर्चा करा, असं भारताकडून पाकिस्तानला सांगण्यात आलं आहे. काश्मीरवर चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने भारतासमोर ठेवला होता, तो फेटाळून लावताना भारताने पाकिस्तानला दहतवादावर चर्चा करा, काश्मीरवर नको असं म्हटलंय.

Aug 17, 2016, 06:33 PM IST

बारामुल्लात लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

बारामुल्ला सेक्टरमध्ये रात्री अडीचच्या सुमारास दहशतवाद्यांनी सापळा रुचून लष्कराच्या एका गस्तीपथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. तर जम्मू काश्मीर पोलिसांचा एक कर्मचारीसुद्धा या हल्ल्यात ठार झाला. 

Aug 17, 2016, 09:35 AM IST

काश्मीरमध्ये सैन्य घुसवा- हाफिज सईद

जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने, भारताला धडा शिकवण्यासाठी काश्मीरमध्ये सैन्य घुसवा, असं म्हटलं आहे.

Aug 16, 2016, 06:06 PM IST

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत अधिकारी शहीद

संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना काश्मीरमध्ये मात्र दहशतवाद्यांनी डाव साधलाय. 

Aug 15, 2016, 01:01 PM IST

पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित पुन्हा भारताविरोधात बरळले

पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे.

Aug 14, 2016, 06:35 PM IST

काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींनी मानले काँग्रेसचे आभार

सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष काँग्रेसचे आभार मानले आहेत, काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या हिंसक विरोधावर पहिल्यांदाच  नरेंद्र मोदी बोलले.

Aug 9, 2016, 09:11 PM IST

काश्मीरच्या मुद्द्यावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

"70 वर्षं स्वातंत्र्याची, याद करो कुर्बानी" या उपक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील अलीराजपूरातल्या भावरा या चंद्रशेखर आझाद यांच्या गावी आझाद यांच्या स्मृती स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावरा इथं जाहीर सभा झाली. या सभेला आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

Aug 9, 2016, 05:05 PM IST

जम्मूत भूस्खलनात वैष्णोदेवीच्या चार भाविकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात चार भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत.

Aug 6, 2016, 09:35 PM IST

श्रीनगरमधून कर्फ्यु मागे, जम्मूत मोबाईल सेवा सुरू

काश्मिरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी आजपासून मागे घेण्यात आलीय. 

Jul 26, 2016, 11:52 AM IST

'काश्मीरला बळकावण्याचं शरीफांचं स्वप्न पूर्ण होणार नाही'

परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या वायफळ बडबडीला सडेतोड उत्तर दिलंय.

Jul 23, 2016, 10:09 PM IST

'काश्मिरींनी घटनेच्या चौकटीत राहून हक्क मागावेत'

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, त्यावर कोणताही वाद किंवा चर्चा करण्याची गरज नसल्याचं भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी म्हटलं आहे.

Jul 23, 2016, 06:12 PM IST