kerala

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधींना म्हटलं `जोकर`

काँग्रेसच्या दारूण पराभवानंतरही राहुल गांधी यांच्या मागे लागलेल्या कटकटी अजून थांबत नाहीतय. कारण काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधी यांना जोकर म्हटलं आहे.

May 29, 2014, 11:16 AM IST

मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल

यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय. मान्सून सामान्यत: 20 मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होतो. मान्सून वेळेआधी दाखल झाला असला, तरी तो केरळात नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने पोहेचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

May 19, 2014, 10:45 AM IST

पद्मनाभस्वामी मंदिरातलं 80 कोटींचं सोनं चोरीला

तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिन्यावर डल्ला मारला जात असल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. या खजिन्यातून आतापर्यंत 80 कोटी रुपये किंमतीचे तब्बल 26 किलो सोनं चोरीला गेल्याचा अहवाल खजिन्यावर देखरेख ठेवणारे प्रतिनिधी अॅमिकस क्युरी, गोपाळ सुब्रमण्यम यांनी सुप्रीम कोर्टाला दिला आहे.

Apr 27, 2014, 11:35 AM IST

चक्क भरणार, माकडांचीच शाळा!

केरळमध्ये लवकरच माकडांची शाळा भरणार आहे... ही माकडचेष्टा नाही, अगदी खरीखुरी बातमी आहे.. या शाळेत माकडं विद्यार्थी असतील, त्यांना रीतसर ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

Oct 22, 2013, 04:26 PM IST

भारतात सुरू झाली ‘स्कीन’ बँक!

पश्चिमी देशांच्या धर्तीवर आता भारतातही स्कीन बँक सुरु झालीय. केरळमध्ये ही स्कीन बँक सुरू करण्यात आलीय.
एका प्लास्टिक सर्जननं दिलेल्या माहितीनुसार स्कीन बँकेमुळं आता त्वचेचं प्रत्यारोपण करण्याची सुविधा उपलब्ध होईल.

Oct 17, 2013, 11:41 AM IST

केरळात मान्सूनची वेळेवर हजेरी

सगळेजण उत्सुकतेने वाट पाहात असलेला मान्सून आज केरळात दाखल झाला. दुष्काळ तसंच उकाड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रात तो आता कधी येतोय याचीच वाट सगळेजण चातकाप्रमाणे पाहतायत.

Jun 1, 2013, 11:02 PM IST

`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`

नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपासून सौदीत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सौदीमध्ये काम करणाऱ्या सात लाख केरळी कामगारांना रोजगारापासून मुकावे लागल्याने ते धास्तावलेत.

Apr 1, 2013, 10:11 AM IST

मान्सून ४८ तासांत धडकणार

उत्तर आणि मध्य भारत कडक उन्हाने होरपळत असताना आज भारतीय हवामान खात्याने एक गुड न्यूज दिली आहे. येत्या ४८ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडकणार असल्याचे भारतीय हवामान खात्याचे संचालक व्ही. के. राजीव यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.

Jun 4, 2012, 06:11 PM IST

शहाळ्याचे पाणी केरळ राज्याचे अधिकृत पेय....

मुंबईत कुठेही शहाळं विकणारा माणूस केरळी असतो. देशभरात शहाळं आणि नारळ यांचा पुरवठा केरळातून मोठ्या प्रमाणावर होतो. केरळ राज्य माडांच्या लागवडीत देशात आघाडीवर आहे. आता शहाळ्याचे पाणी हे लवकरच केरळ राज्याचे अधिकृत पेय म्हणून घोषित करण्यात येणार आहे हे वाचून आश्चर्य वाटायला नको.

Mar 19, 2012, 03:41 PM IST