मुंबई, कोकणासह मराठवाडयात पाऊस
आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाडयात वरूण राजा बरसला.
Jul 9, 2014, 07:56 AM ISTकोकणात दुबार पेरणीचे संकट
पावसाने संपूर्ण राज्यात दडी मारलीय. कोकणात जूनच्या सुरूवातीला थोडासा पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांनी भातशेतीच्या पेरण्या केल्या ख-या पण आता पावसाची चिन्ह नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं राहीलंय. त्यातच धरणाच केवळ 32.47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा 2 महिने पुरेल इतकाच आहे. त्यामुळे कोकणात पाणीसंकट उभं राहीलंय.
Jun 26, 2014, 11:45 PM ISTकोकणात पावसाअभावी दुष्काळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 08:06 PM ISTमुंबईसह कोकणात समुद्राला उधाण, भरतीचे पाणी रस्त्यावर
मुंबईसह कोकण किणारपट्टीवर आज समुद्राला उधाण आले. समुद्राच्या उंच लाटाने दादर, वरळी या ठिकाणी पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तर रत्नागिरी आणि सिंधुुदुर्गात भरतीचा तडाखा बसला.
Jun 12, 2014, 01:34 PM ISTकोकणात मान्सून`इलो रे बा इलो`
कोकणात मृग नक्षत्राच्या पावसाने सलामी दिली आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यात मान्सूनचं आगमन झालं आहे.
Jun 11, 2014, 05:43 PM ISTसुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव
मुळच्या कोकणातल्या चिपळूणच्या असलेल्या इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय.
Jun 5, 2014, 11:35 PM ISTलोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव
लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.
Jun 5, 2014, 07:50 PM ISTपावळेचा पाणी पाष्टाक !
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !
May 17, 2014, 11:21 AM ISTमुंबई उपनगरांसह पुणे कोकणात वादळी पाऊस, वाहतूक विस्कळीत
मुंबई उपनगरांसह पुणे आणि कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जुन्या हायवेवरील वाहतूकही विस्कळीत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
May 7, 2014, 06:25 PM ISTलोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.
Apr 17, 2014, 12:23 PM ISTकोकणात राष्ट्रवादीचा असहकार, राणेंचे डोकेदुखी वाढली
सध्या कोकणात राणे विरुद्ध राष्ट्रवादी असं धुमशान सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या असहकारामुळे काँग्रेसची अर्थात राणे यांची डोकेदुखी वाढली आहे. नक्की कोकणातला हा राडा काय आहे. आणि त्याचा या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याचीच चर्चा जास्त आहे.
Apr 12, 2014, 04:31 PM ISTराणेंविरोधात भूमिका घेणाऱ्या सावंत यांना पक्षाची नोटीस
उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आमदार विजय सावंत यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. राणेंविरोधातील भूमिकेबाबत तात्काळ खंडन करा आणि कामाला लागा अन्यथा कारवाई केली जाईल, असे दिलेल्या नोटीसमध्ये इशारा देण्यात आला आहे.
Apr 11, 2014, 06:23 PM ISTराष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचाच राणेंवर हल्लाबोल
काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनीही `घरचा आहेर` दिल्यानं उद्योगमंत्री नारायण राणेंची डोकेदुखी आणखी वाढलीय. राणेंनी सिंधुदुर्गातली काँग्रेस संपवली. आता जी अस्तित्वात आहे ती राणे समर्थक काँग्रेस आहे, असा तिखट हल्ला सावंत यांनी चढवलाय.
Apr 9, 2014, 06:57 PM ISTकोकणात राणेंविरोधात सर्व विरोधक - संजय राऊत
कोकणातील लोकसभेची निवडणूक नीलेश राणे विरुद्ध सर्व विरोधक अशी आहे. ही निवडणूक शिवसेना जिंकेल कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात पाहायला मिळेल, असा आशावाद शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिंधुदुर्गात व्यक्त केलाय.
Apr 8, 2014, 09:04 PM ISTमनसे लोकसभा निवडणुकीसाठी कोकणात `नोटा` वापरणार
लोकसभा निवडणुकीत रंगतदान लढतीमध्ये कोकणचा समावेश आहे. याठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात काम करण्याची भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला उमेदवार दिलेला नाही. आपली मते कोणाच्या वाट्याला जाऊ नयेत म्हणून मनसे नकाधिकार म्हणजेच `नोटा` (यापैकी कोणीही नाही) याचा वापर करणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार नसल्याने काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.
Apr 8, 2014, 04:40 PM IST