marathi news

पत्नीसोबतचा वाद मिटवायला आलेल्या व्यक्तीलाच मारून टाकलं; मग पोलिस स्टेशन गाठत म्हणाला...

Kolhapur Crime : कोल्हापुरात एका वनकर्मचाऱ्याची निर्घृणपणे हत्या झाल्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हत्या झालेली व्यक्ती आणि आरोपी दोघेही मित्र होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Sep 14, 2023, 01:19 PM IST
Shivsena MLA Disqualify Hearing Started PT3M55S
Jalna Antarwali Sarati Chief Minister Eknath Shinde meet Manoj Jarange PT12M59S

काय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral

इझीजेटच्या फ्लाइटमधल्या टॉयलेटमध्ये लैंगिक कृत्य करताना पकडलेल्या जोडप्याला पोलिसांना विमानातून बाहेर काढावे लागले. केबिन क्रूने विमान हवेत असतानाच हा प्रकार उघडकीस आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Sep 14, 2023, 11:57 AM IST

मनोज जरांगेंनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांना अखेर यश

Maratha Reservation: जालन्याच्या (Jalna) अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेले उपोषण अखेर संपलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवलं आहे.

 

Sep 14, 2023, 11:03 AM IST

बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

Bhandara Farmer: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.

Sep 14, 2023, 10:31 AM IST

अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवले; मृत्यूनंतर सैतानासारखा हसला

अमेरिकेत पोलिसांच्या गाडीने धडक दिल्याने एका भारतीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणीचे बॉडी कॅमेरा फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये तरुणीची हत्या केल्यानंतर पोलिस अधिकारी फोनवर हसताना आणि विनोद करताना दिसत आहे. 

Sep 14, 2023, 09:58 AM IST

Hindi Diwas:हिंदी आपली राष्ट्रभाषा? खूप झाले वाद, आज जाणूनच घ्या, महात्मा गांधींशी आहे कनेक्शन

Hindi Diwas:पहिला हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953 रोजी अधिकृतपणे साजरा करण्यात आला.10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो हिंदी ही भारताची अधिकृत भाषा आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर, संविधान सभेने 14 सप्टेंबरला हिंदी ही भारताची अधिकृत भाषा असेल असा निर्णय घेतला. घटनेच्या कलम 343 (1) मध्ये याचा उल्लेख आहे. त्यानुसार भारताची अधिकृत भाषा हिंदी आहे आणि लिपी देवनागरी आहे.

Sep 14, 2023, 09:36 AM IST

'जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला'; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार

Jawan Movie : भाजपाने कॉमनवेल्थ गेम्स, 2जी आणि कोळसा घोटाळ्यांचा हवाला देऊन भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा काळात एकही घोटाळा झालेला नाही, असेही भाजपाने म्हटलं आहे.

Sep 14, 2023, 08:51 AM IST