matoshree

शिवसेना मंत्र्यांची आज मातोश्रीवर बैठक

सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्र्याची मातोश्रीवर बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी 'मातोश्री'वर बोलावली आहे. ही नियमित बैठक असल्याचे सांगितले जात असले तरी, त्यात राज्य सरकारमध्ये पक्षाच्या मंत्र्याची कामगिरी तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा होईल. 

Mar 30, 2017, 12:04 PM IST

भाजपचे दोन मंत्री मातोश्रीवर जाणार!

भाजपचे दोन वरिष्ठ मंत्री लवकरच मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबतचे वाद आणि कटुता मिटवण्यासाठी भाजपचे हे दोन मंत्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 

Mar 25, 2017, 08:02 AM IST

मातोश्रीवरून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीचं बोलावणं

मातोश्रीवरून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीचं बोलावणं

Mar 1, 2017, 03:58 PM IST

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मातोश्रीवर...

रावसाहेब दानवे त्यांचा मुलगा संतोष दानवेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Feb 22, 2017, 08:26 PM IST

उद्धव ठाकरेंनी केलं 'हार्दिक' स्वागत

 गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी आरक्षणाचं आंदोलन छेडणारा हार्दिक पटेल आज मातोश्रीवर दाखल झाला. 

Feb 7, 2017, 12:56 PM IST

शिवसेना-मनसेमध्ये खलबतं, बाळा नांदगावकर मातोश्रीवर

भाजपसोबतची शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेना आणि मनसेमध्ये खलबतं सुरु झाली आहेत.

Jan 29, 2017, 07:24 PM IST

मातोश्रीवर शिवसेनेच्या विभाग प्रमुखांची बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक मातोश्रीवर सुरू आहे. भाजप सोबत युती करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा सुरू आहे. त्याच बरोबर भाजपला कोणत्या जागा सोडायच्या याची ही चर्चा होणार आहे.

Jan 12, 2017, 03:46 PM IST

उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी विनायक मेटे मातोश्रीवर

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Jan 8, 2017, 09:12 PM IST

'मेट्रो'चे अधिकारी मातोश्रीवर

गिरगावात मेट्रो तीन प्रकल्पाचे बांधकाम स्थानिक रहिवाश्यांनी बंद पाडल्यानंतर मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी आणि मुंबई मेट्रो रेल कॉरपोरशन च्या प्रमुख अश्विनी भिडे यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Dec 3, 2016, 10:16 PM IST

नोटबंदीमुळे त्रस्त व्यापारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

नोटबंदीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

Nov 20, 2016, 10:07 PM IST

शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक

दिल्लीत उद्या सुरू होणा-या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह मित्रपक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक घेतली. या बैठकीत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरील भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.

Nov 15, 2016, 05:58 PM IST