मुंबईतील रेल्वे प्लेटफॉर्मचं ऑडिट करा - हायकोर्ट
मुंबई हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला महत्वाचा आदेश दिलाय. मुंबईतल्या रेल्वे प्लेटफॉर्मचं ऑडिट करुन रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्ममधल्या पोकळीबाबत रेल्वेनं एक समिती स्थापन करुन ३ ते ४ आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.
Feb 13, 2014, 04:06 PM ISTशरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण - कोर्ट
शरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. आपल्या जोडीदाराला जाणीवपूर्वक शारीरिक सुख नाकारणे हा त्या जोडीदाराचा मानसिक छळ आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Jan 23, 2014, 07:51 AM ISTमुंबई हायकोर्टाचा अजित पवार आणि पतंगरावांना दणका
मुंबई उच्च न्यायालयाची अजित पवार आणि पंतगराव क़दम यांना दणका. पंतगराव क़दम हे महसूल मंत्री असताना, पुण्यातील पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाच्या ताब्यात असलेली जागा हडपण्याचा या दोन्ही मंत्र्यांचा प्रयत्न होता. पण त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीये.
Jan 21, 2014, 08:40 PM ISTपोलिसांना मुंबई कोर्टाने फटकारलं, मार्ड संपाने रूग्णांचे हाल
मार्डच्या संपाबाबत सू मोटो याचिका दाखल करून घेणा-या मुंबई उच्च न्यायालयाने आज पोलिसांना चांगलं सुनावलं. दरम्यान, तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्यानंतरही मार्डचा संप सुरू असल्याने रूग्णांचे हाल होत आहे.
Jan 3, 2014, 03:14 PM ISTमुख्यमंत्री कोट्यातून मंत्र्यांच्या नातेवाईकांना घरे, कोर्टाचा दणका
मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांवर काय कारवाई करणार किंवा केली याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांच्या यादीमध्ये तिघा कॅबिनेट मंत्र्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
Dec 12, 2013, 07:40 AM ISTविवाहित महिलांना मिळणार अनुकंपा तत्वावर नोकरी
मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे विवाहित महिलांना अनुकंपा तत्वावर आता नोकरी मिळणार आहे. पुण्याच्या स्वरा कुळकर्णी यांनी राज्य सरकारच्या १९९४ च्या जी आरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.
Dec 6, 2013, 10:33 PM ISTचला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी
अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2013, 08:15 AM IST‘क्रिश-३`ची स्क्रिप्ट चोरीची?
अभिनेता हृतिक रोशन याच्या ‘क्रिश-३`ची स्क्रिप्ट चोरीची असल्याचा आरोप मध्य प्रदेशच्या एका लेखकानं केलाय. त्याविरोधात मुंबई हायकोर्टात स्वामित्व हक्कभंगाची याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी आहे.
Oct 29, 2013, 08:39 AM IST...अशा 'सेक्स'ला बलात्कार मानणार नाही- कोर्ट
प्रेमाच्या भानगडीत `तिचं` पाऊल वाकडं-तिकडं पडलं आणि नंतर प्रेमप्रकरण फसलं तर बलात्कार झाल्याचा आरोप संबंधित मुलीला करता येणार नाही.
Jul 13, 2013, 04:30 PM IST`मी पत्नीप्रमाणे राहिले!' लग्नास कोर्टाचा नकार
मी त्याच्यासोबत अनेक वर्ष पत्नीप्रमाणे राहत आहे. मला त्याच्याशी लग्न करायचेय, अशी मागणी करत एक याचिका महिलेने न्यायालयात दाखल केली. मात्र, कोर्टाने तिला फटकारत त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त करु नकोस, असे बजवाले. तिला विवाहापासून रोखले.
Jul 11, 2013, 11:13 AM ISTगणेश नाईक यांना हायकोर्टाचा दणका
ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. बेलापूर एमआयडीसीमधले ग्लास हाऊस पाडून बावळेश्वर मंदिराची जागा ताब्यात घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
Jul 6, 2013, 09:37 AM ISTराज ठाकरे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एकमत’
राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवरील टोलनाके टोल वसूली करीत आहेत. जर रस्ते खराब असतील तर टोल कशाला आकारता? हे थांबबा, अन्यथा सहनशक्ती संपेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने खराब रस्तावर बोट ठेवलेय. अशा रस्त्यांचा लोकांकडून टोल घेतला तर लोकांची सहनशक्ती संपते. त्यानंतर लोक कायदा हातात घेतात, असे मत न्यायालयाने नोंदवलेय.
Jun 29, 2013, 08:23 AM ISTराज ठाकरेंविरोधात याचिका दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवरील आता सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता लागली आहे.
Apr 24, 2013, 08:55 PM ISTअजित पवारांच्या ‘सूSSSSराज्या’ला हायकोर्टाचा दणका!
ज्या उजनी धरणाच्या पाण्यावरून हे ‘सु’नाट्य रंगलंय त्याचबद्दल उच्च न्यायालयानं नागरिकांच्या बाजूनं निर्णय देत सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे जमिनीवर आणलंय.
Apr 10, 2013, 12:52 PM ISTहोर्डिंग्जबाजीला हायकोर्टाचा चाप
महापालिका क्षेत्रातल्या अनधिकृत होर्डिंग्ज तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. महापालिकांनी यावर तात़डीनं कारवाई करावी आणि 24 तासांत याचा अहवाल सादर करावा असे निर्देशही कोर्टानं दिले आहेत.
Mar 13, 2013, 09:18 PM IST