सेना भवनाचा आधार घेणं हा दुबळेपणा- उद्धव

"कुणी कुठे सभा घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी सेना भवनाचा आधार घेणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे." असा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला.

Updated: Feb 8, 2012, 04:12 PM IST

www.24taas.com, मुंबई
 
"कुणी कुठे सभा घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी सेना भवनाचा आधार घेणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे." असा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला.
 
पत्रकार परिषदेत बोलताना आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनाच जिंकून येईल असा विश्वास व्यक्त केला. मुंबईकरांचं शिवसेनेवर प्रेम आहे. आणि गेल्या वेळेपेक्षाही यंदा शिवसेनेला जास्त जागा मिळतील असा विश्वास आम्हाला आहे असं उद्धव ठाकरे या वेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
 
“निवडणुकीच्या काळात सगळे पक्ष एकमेकांना प्रत्युत्तरं देत असतात. मात्र विकासाबद्दल कुणीच बोलत नाही.” असं सांगत उद्धव यांनी आपल्या 'करून दाखवलं' या होर्डिंगबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीचा जाहीरनामा उद्या जाहीर करणार असल्याचंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.