prithviraj chavan

कापूस दरवाढीवर अजून तोडगा नाहीच!

कापसाच्या प्रश्नावर आता बैठकांवर बैठका होत आहेत. तरी या बैठकीतून तोडगा निघणार का, असा प्रश्न आहे. चार वाजता कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यामध्ये कापसावर खल होणार आहे.

Nov 23, 2011, 10:46 AM IST

अण्णांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

लवासा प्रकरणी अण्णांनी मुख्यमंत्र्यांवरच ताशेरे ओढलेत. लवासा प्रकरणी मुख्यमंत्री दुटप्पी भूमिका कसे काय घेऊ शकतात, असा खडा सवाल केला अण्णांनी. यासंदर्भात अण्णांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये लवासा नियमित कसं काय करता येऊ शकतं, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Nov 8, 2011, 02:09 PM IST

मुंबई उपनगरांसाठी जादा .३३ एफएसआय

दोन वर्षांपासून रखडलेला मुंबई उपनगरांसाठी जादा .३३ एफएसआय देण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला.

Nov 5, 2011, 01:25 PM IST

मुख्यमंत्र्यांना 'लवासा', वाटे हवा हवासा !

'लवासा' ने पर्यावरणासंदर्भात केलेल्या चुकांबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातलेल्या अटींची जर 'लावासा'ने पुर्तता पहिल्या टप्प्याला परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पर्यावरण मंत्रालयाला केली आहे.

Nov 4, 2011, 05:54 PM IST

नरेगासाठी केंद्राकडून अधिक निधी-मुख्यमंत्री

येत्या वर्षभरात केंद्राकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना राबविण्याकरता राज्याला २००० कोटी रुपये मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. नागपूर इथे एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही कबूली दिली की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्र कमी निधी मिळवू शकला.

Oct 29, 2011, 01:40 PM IST

निरूपमांचे उधळलेले वारू, मुख्यमंत्र्यांनी आवरले

उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई ठप्प होईल, असे बेताल वक्तव्यांचे वारू उधळविणाऱ्या काँग्रेस नेते संजय निरूपमांना चाप लावत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई बंद होणार नसल्याचे सांगितले आहे.

Oct 24, 2011, 12:32 PM IST

जावयाचा 'कारनामा'.. नर्सना लाविले 'कामा'

मि. क्लिन अशी प्रतिमा जपणारे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या आजारी आणि वयोवृद्ध सासूबाईंच्या दिमतीला सरकारी हॉस्पिटलमधील नर्सेसना ' कामाला लावले आहे

Oct 11, 2011, 12:06 PM IST