rain

ठाणेकरांसाठी खुशखबर, बारवी धरण ओव्हरफ्लो

ठाणे जिल्ह्यासाठी ही आहे गुड न्यूज... बारवी धऱण ओव्हर फ्लो झाल्यानं पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्याला पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही. 

Jul 24, 2017, 04:26 PM IST

पुण्यात मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश

जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत आहे. या पावसाने खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

Jul 22, 2017, 07:46 PM IST

कोल्हापुरात पावसाची उसंत, पूरस्थिती जैसे थे

पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगा नदी अजूनही इशारा पातळीवरुन वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग सलग चौथ्या दिवशाही बंद आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागते. 

Jul 22, 2017, 06:49 PM IST

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय. 

Jul 22, 2017, 04:23 PM IST

पुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून

कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात पाच दिवसांपासून झाडावर अडकून पडलेल्या माकडांना अन्न पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या माकडांचा जीव वाचलाय.

Jul 21, 2017, 11:05 PM IST

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या  बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.

Jul 21, 2017, 10:32 PM IST

चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय. 

Jul 20, 2017, 03:50 PM IST