rain

चंद्रपुरात आतापर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस

चंद्रपूर जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आत्तापर्यंत केवळ 30 टक्के पाऊस पडलाय. त्यामुळे सगळेच जण पावसासाठी धावा करतायत. 

Aug 14, 2017, 05:34 PM IST

आसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर

आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.  राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.

Aug 14, 2017, 01:43 PM IST

राज्यातील ५२ तालुक्यांमध्ये पावसाची दडी

राज्यातील कोकण महसूल विभाग वगळता बावन्न तालुक्यात पावसाने दडी मारली आहे . या तालुक्यात पन्नास टक्क्याहून कमी पाउस झाला आहे. यात औरंगाबाद म्हणजेच मराठवाड्यात सर्वाधिक तालुक्यात संकट आहे. तर त्यामागे अमरावती महसूल विभगातील पंधरा तालुक्याठी हे संकट उभे ठाकले आहे. 

Aug 12, 2017, 10:55 PM IST

मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत, ४८ दिवसांपासून पावसाची दडी

मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत आहे. ४८ दिवसांपासून पावसानं दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे.  

Aug 11, 2017, 01:03 PM IST

मराठवाड्यात चांगला पाऊस व्हावा म्हणून कावड यात्रा

मराठवाड्यात चांगला पाऊस व्हावा यासाठी औरंगाबादमध्ये कावड यात्रा काढण्यात आली. हर्सूलच्या हरीसिद्धी माता मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली. हजारो नागरिकांनी पावसासाठी महादेवाला साकडं घातलं.

Aug 7, 2017, 12:53 PM IST

मोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले. 

Aug 1, 2017, 08:38 AM IST

कोल्हापूरच्या पुरात अडकलेल्या माकडांची थरारक सुटका

कोल्हापूर जिल्ह्यात सलग पडलेल्या पावसामुळे पुरपरिस्थीती निर्माण झाली होती.

Jul 29, 2017, 02:22 PM IST

नगरची पाण्याची चिंता मिटली, निळवंडे धरण भरलं

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पुढे प्रवरा नदीवर असलेले निळवंडे धरण तांत्रिकदृष्ट्या भरलंय.

Jul 29, 2017, 12:24 PM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणक्षेत्रातील पाऊस आणि धरणातील पाणीसाठा या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

Jul 29, 2017, 11:45 AM IST

गुजरातमध्ये तुफान पावसाने पूरस्थिती, १२३ जणांचा बळी

मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण या आणि इतर भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये आतापर्यंत १२३ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 

Jul 27, 2017, 10:30 PM IST

गुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी

 गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.

Jul 25, 2017, 11:31 PM IST