rain

भारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय असल्याने खेळ सुरु होऊ शकलेला नाहीये. 

Jul 20, 2017, 03:45 PM IST

सलग सहाव्या दिवशीच्या पावसानं कोयनेच्या साठ्यात वाढ

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पावसाची संततधार कायमच राहिल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे. 

Jul 19, 2017, 11:50 PM IST

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती

सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. 

Jul 19, 2017, 09:41 PM IST

विदर्भाला पावसानं झोडपलं!

विदर्भातल्या अकोला, वर्धा आणि भंडारा जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं आहे.

Jul 19, 2017, 07:13 PM IST

चंद्रपुरात पावसाची दमदार हजेरी, पेरणींच्या कामांना वेग

जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. वीस दिवसांच्या ब्रेकनंतर आलेल्या पावसाने धान उत्पादक म्हणून ओळख असलेल्या सिंदेवाही, ब्रह्मपुरी आणि नागभीड भागात पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

Jul 19, 2017, 09:10 AM IST

महाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा

रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.

Jul 18, 2017, 11:15 PM IST

खंडाळा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीला फटका

मुंबईकडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई हैदराबाद एक्स्प्रेससमोर खंडाळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकीहील स्टेशनदरम्यान दरड कोसळली. 

Jul 18, 2017, 10:15 PM IST

मुसळधार पावसाने भिवंडीत ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले

भिवंडी महापालिका क्षेत्रासोबतच तालुक्यात रात्रीपासून पड़त असलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचलेय. नदीनाका परिसरात सुमारे ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे महापालिकेचे नालेसफाई झाल्याचे दावे वाहून गेले. 

Jul 18, 2017, 10:02 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात वाढ

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यामुळं पाणीसाठा वाढायला लागलाय. तानसा, मोडकसागर, भातसा या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेय.

Jul 18, 2017, 06:06 PM IST

विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले

मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस सुरू असतानाच, विदर्भालाही मुसळधार पावसानं झाडपून काढलंय.  सोमवारी मध्यरात्री यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीय. चार तासात 135 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय.

Jul 18, 2017, 05:50 PM IST

कोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी

कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, नद्या दुथडी वाहत आहेत.

Jul 18, 2017, 04:35 PM IST