rain

गळक्या मेट्रोमध्ये भिजते रविना टंडन

 अनेक वर्षांपासून मुंबईकर ज्या मेट्रोची वाट पाहत होते, ती गेल्या महिन्यात धुमधडाक्यात सुरू झाली मेट्रो पहिल्या पावसात गळायला लागली. या मेट्रो गळतीची सोशल मीडियावर चांगलीच टर उडवली आहे.

Jul 4, 2014, 06:44 PM IST

मुंबईत पाऊस सुरुच, मध्य रेल्वे उशिराने

 मुंबईत बुधवारपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली.

Jul 4, 2014, 10:26 AM IST

मराठवाड्यात जेमतेम 22 टक्के पाऊस

 यंदा जुलै उजाडला तरी मराठवाड्यात आतापर्यंत जेमतेम 22 टक्के पाऊस पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ आली आहे या परिस्थितीत डोळे आभाळाकडे लागले असले तरी नियोजनातील गंभीर चुकासुद्धा दुष्काळाला हातभारच लावत असल्याचं चित्र आहे. आकडेवारी पाहिली तर राज्यात मराठवाडा प्रकल्पांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे तरीही दुष्काळ पाजवीला पुजलेला आहे.

Jul 3, 2014, 03:58 PM IST

मुंबईत दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर

 जुलै महिन्यात दाखल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईत दैना उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर दिसून आला. मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. आज दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईत चांगलाच गारवा पसरलाय. या पावसाचा मेट्रो रेल्वेला दणका बसला. तर दुसरीकडे आजपासून मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आलेय. हा पाऊस दोन दिवस सुरुच राहण्याची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.

Jul 3, 2014, 07:42 AM IST