resigned

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या - काँग्रेस

 राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अहमदनगर सामूहिक बलात्कार प्रकरण आणि नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या कैद्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी केलीय.

Apr 2, 2015, 12:10 AM IST

शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडणार

केंद्रातील भाजप आणि शिवसेना युती संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आल्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय अवजड मंत्री अनंत गिते आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा, नरेंद्र मोदी यांना सोपवणार आहेत.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

Sep 29, 2014, 01:13 PM IST

शीला दीक्षित यांचाही केरळ राज्यपालपदाचा राजीनामा

 केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनीही आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द केला. मी कालच राज्यपालपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राजीनामा दिला होता.

Aug 26, 2014, 10:16 PM IST

सूर्यकांता पाटलांचा राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा

माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.. त्यांनी पक्ष कार्यालयात आपला राजीनामा पाठवलाय.. पुढील चार ते पाच दिवसांत पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी सांगितलंय.

Aug 24, 2014, 11:05 PM IST

आमदार किसन कथोरेंचाही राष्ट्रवादीला रामराम

आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. किसन कथोरे हे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

Aug 24, 2014, 08:07 PM IST

के.शंकरनारायणन यांचा राज्यपालपदाचा राजीनामा

महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बदलीचा आदेश स्वीकारण्याआधी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. के शंकरनारायणन यांची मिझोरामच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली होती. या नंतर के शंकरनारायणन यांनी राज्यपालपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

Aug 24, 2014, 07:45 PM IST

नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर आरोप

नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नाराजीची कारण मांडली.

Jul 21, 2014, 03:24 PM IST

नारायण राणेंचा उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा

नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी मनधरणीसाठी बोलावलं होतं. मात्र मुख्यमंत्री निवासस्थानीच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना आपला राजीनामा सोपवला आहे. 

Jul 21, 2014, 01:12 PM IST