sachin tendulkar

"सचिनला खासदारकी का?" - कोर्टाचा सवाल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेची शपथ कशी द्यावी, असा प्रश्‍न दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला आज विचारला असून या संदर्भात नोटीस जारी केली आहे. सचिनच्या खासदारकीवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेची दखल घेत कोर्टाने केंद्राला ही नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्राला पाच जुलैपर्यंतची मुदतही देण्यात आली आहे.

May 16, 2012, 04:35 PM IST

सचिनचा शपथविधीचा मार्ग मोकळा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा राज्यसभा खासदारकीच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झालाय. त्याच्या खासदारकीवर स्थगिती आणण्यास दिल्ली हायकोर्टानं नकार दिलाय. स्थगिती आणण्यास नकार दिला असला तरी सचिनला खासदारकी कोणत्या निकषावर देण्यात आली याचा खुलासा करण्याचे आदेश मात्र कोर्टाने दिले आहेत.

May 16, 2012, 04:08 PM IST

सचिन तेंडुलकर नियुक्ती रद्दला नकार

विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १०० शतके झळकावल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या खेळाची दखल घेत केंद्र सरकारने राज्यसभेवर घेण्याचे ठरविले आणि त्याची निवडही केली. मात्र, सचिनची राज्यसभेवरील नियुक्ती रद्द करण्याची मागणी माजी आमदार रामगोपाल सिसोदिया यांनी केली होती. परंतु न्यायालयाने नियुक्तीस नकार दिला आहे.

May 15, 2012, 09:21 AM IST

रेखा मंगळवारी, सचिन बुधवारी घेणार शपथ!

राज्‍यसभेसाठी नामनियुक्त करण्यात आलेला मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर बुधवारी संसदेत शपथ घेणार आहे. तर बॉलिवूडची एवरग्रीन अभिनेत्री रेखा मंगळवारी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

May 14, 2012, 06:38 PM IST

अर्जुनचे क्रिकेटवर प्रेम - सचिन तेंडुलकर

मी माझ्या मुलावर कोणतीही गोष्ट लादणार नाही. त्याला भविष्यात जे काही करायचे आहे, त्याचा निर्णय तो घेईल, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेकवेळा सांगितले तरी अर्जुनचे क्रिकेटवर प्रेम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सचिनचा मुलगा क्रिकेटमध्ये पदापर्ण करण्याचे संकेत मिळाले आहेत.

May 10, 2012, 02:43 PM IST

खासदार सचिन आता अभिनेत्याच्या भूमिकेत?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने विधू विनोद चोपडा यांना त्यांच्य ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटामध्ये आपले नाव वापण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या चित्रपटात सचिन तेंडुलकर अभिनेता म्हणून आपल्या समोर येण्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये आहे.

May 9, 2012, 06:11 PM IST

सचिनच्या कतृत्वाला सोन्या-चांदीचा मुलामा

सचिनचे महाशतक मिरपूरमधील शेर-ए-बांगला मैदानावर साजरे झाले आणि वर्षभर लांबलेली महाशतकाची प्रतिक्षा संपली. सचिनवर कौतुकाचा वर्षाव सुरूच आहे. आता पुण्यातील एक संस्था सचिनला १ किलो सोनं आणि ६ किलो चांदीची ट्रॉफी देऊन गौरव करणार आहे.

May 8, 2012, 04:15 PM IST

सचिनला नाही १०० क्र. आसन, रेखापासून दूर जया बच्चन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेत १०३ क्रमांकाच्या सीटने आपल्या राजकीय खेळीची सुरूवात करणार आहे. विजय माल्या आणि शेतीशास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्यामधली जागा मास्टर ब्लास्टरला देण्यात आली आहे.

May 4, 2012, 08:59 PM IST

सचिन जगभरातल्या चाहत्यांच्या भेटीला

जगातल्या सहा शहरांमधील चाहत्यांना आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरसोबत संध्याकाळ घालवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. फिडेलिस वर्ल्ड ग्रुपतर्फे पुढील तीन वर्षं ही सेलब्रेशन सिरीज आयोजित करण्यात आली आहे.

May 2, 2012, 04:09 PM IST

सचिनला मुंबईसाठी वेळ आहे का?

सचिनकडे मुंबईसाठी वेळ नसल्याची खंत माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केलीय. महाराष्ट्र दिनीनिमीत्त मुंबईच्या अठरा माजी महापौरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

May 1, 2012, 01:03 PM IST

अमिताभ,रेखा करणार सिलसिला पार्ट-२!

रुपेरी पडद्यावरील सुपरहिट जोडी अमिताभ आणि रेखा पुन्हा आपल्याला एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली कथा असल्यास आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो अशी तयारी स्वतः बिग बी यांनी दर्शविली आहे. त्यामुळे सिलसिला पार्ट-२ लवकरच येण्याची शक्यता वाढली आहे.

Apr 29, 2012, 12:14 PM IST

बिग बींच्या रेखा, सचिनला शुभेच्छा

अभिनेत्री रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेसाठी नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही खासदारपदासाठी लायक असल्याचेही बिग बी यांनी म्हटले आहे

Apr 29, 2012, 11:07 AM IST

सचिनच्या खासदारकीने मांजरेकर हैराण

देशात बदल घडवण्याइतका वेळ तरी तो राज्यसभेला नक्कीच देऊ शकतो. पण सचिन खूपच साधा आहे. तो क्रिकेटचे प्रश्नही राज्यसभेत मांडू शकणार नाही." असं मांजरेकर म्हणाले

Apr 27, 2012, 07:10 PM IST

सचिनने ऑफर स्वीकारली, रेखाही खासदार

विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची ऑफर स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन तेंडूलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्र पाठवले होते. यावर राष्ट्रपतींचीही मोहर उमटली. सचिनबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती अनु आघा यांच्या नावाचीही शिपारस करण्यात आली होती. रेखानेही खासदारकी स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Apr 27, 2012, 08:50 AM IST

सचिन खासदार होणार?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिनसमोर राज्यसभेच्या खासदारकीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्पोर्टसच्या कोट्यातून नामनियुक्त सदस्य म्हणून सचिनने खासदार व्हावे, असा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Apr 27, 2012, 08:40 AM IST