sangali

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे पोस्टर जाळले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादा आणि आर. आर. आबा यांच्यावर केलेल्या टीकेचे संतप्त पडसाद सांगलीत उमटले आहेत.

Feb 23, 2013, 04:54 PM IST

महापौरांचा प्रताप, लग्नात महापौरांचे चोपदार

सांगलीचे महापौर इद्रीस नायकवडी त्यांच्या मुलाच्या शाही विवाहामुळं वादात सापडले असतानाच त्यांच्या मुलाच्या लग्नात मनपा कर्मचा-यांना जुंपल्याची धक्कादायक बाब उघड झालीये.

Feb 19, 2013, 04:53 PM IST

राज ठाकरे आज सांगलीत संवाद साधणार

महाराष्ट्राच्या दौ-यावर निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सांगलीतल्या पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे कालच सांगलीत दाखल झालेत.

Feb 11, 2013, 01:09 PM IST

ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी

उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.

Nov 22, 2012, 10:07 AM IST

सांगलीत शेतकऱ्यांवर गोळीबार, दोन ठार

शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात दोन शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सांगलीत आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Nov 12, 2012, 04:23 PM IST

प्रेयसीवर सामूहिक बलात्कार करून केला खून

सांगली जिल्ह्यातील विटा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वारंवार लग्नासाठी तगादा लावणार्‍या प्रेयसीवर प्रियकराने आपल्या तीन मित्रांसह सामूहीक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला आहे.

Oct 19, 2012, 05:25 PM IST

वेश्या वस्तीत सुरू झाली अंगणवाडी!

सांगलीतल्या वेश्या वस्तीतील मुलांसाठी राज्य सरकारनं पहिली अंगणवाडी सुरू केली. आणि सेक्स वर्कर अमिरबी शेख यांच्या कार्याचं आणखी एक पाऊल पुढे पडलं. चार वर्षांपूर्वी अमिरबी शेख यांनी देशातील पहिली वेश्या वस्तीतील शाळा सुरू केली.

Jul 4, 2012, 11:38 PM IST

स्मिता पाटीलची राष्ट्रवादीत एंट्री

राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील हिने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या माध्यमातून स्मितानं राजकारणात पाऊल टाकलं आहे.

Jul 2, 2012, 08:45 PM IST

सांगलीत आहारासाठी बचगट कर्जबाजारी

कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. तर बचत गट सक्षम व्हावे या उद्देशानं पोषण आहाराची काम सरकारनं बचत गटांकडे दिली. पण यामुळं बचत गटांचं नुकसानच जास्त होतंय. सांगली जिल्ह्यातल्या हरीपुरमधल्या बचत गटांना कर्ज काढून आणि उसनवारीवर पोषण आहार बनवावा लागतोय.

Jun 20, 2012, 08:24 AM IST

राज्यात शेतीची नशा

सुरेंद्र गांगण

बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अफूची शेती फोफावत आहे. बीड जिल्ह्यात प्रथम अफूच्या शेतीची पाळेमुळे दिसून आली. मात्र, ही पाळेमुळे खोलवर रूजलेली होती. कृषी अधिकाऱ्यांना चक्क चुना लावून अन्य शेतीच्या नावाखाली अफूची पेरणी केली गेली. ही पेरणी बक्कळ पैसा मिळविण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या शेतीची नशाच शेतकऱ्याला पडलेली दिसून येत आहे.

Jun 5, 2012, 06:02 PM IST

'झी २४ तास'च्या बातमीची दखल

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करेवाडी गावाकऱ्यांच्या रेशनकार्डांचा प्रश्न ‘झी 24 तास’नं लावून धरल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.

May 15, 2012, 05:29 PM IST

सांगलीत दुष्काळाचे भयाण वास्तव्य

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त जनतेच्या अनेक समस्यांचे भीषण वास्तव्य आत्ता समोर येत आहे.' जत ' तालुक्यातील ' करेवाडी ' गावातील लोक मागील बारा वर्षापासून रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. गावातील ऐंशी टक्के लोकांना रेशनकार्डच देण्यात आली नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही येथील दुष्काळ ग्रस्तांची पाणी आणि चाऱ्या बरोबरच आत्ता अन्न धान्यासाठी परवड सुरु आहे.

May 15, 2012, 12:49 PM IST

दुष्काळाचे रण पेटले...शेतकरी संतापले...मडके फुटले!

राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर झालेला असताना, आता या मुदद्यावर रस्त्यावरही रण पेटायला सुरुवात झालीय. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधाचा हा उद्रेक व्यक्त होऊ लागलाय. मुंबईत मंत्रालयाबाहेर रिपाईतर्फे मटकाफोड आंदोलन करण्यात आलय

May 7, 2012, 07:23 PM IST

दाम्पत्याची तीन मुलींसह आत्महत्या

वाढती महागाई, घाट्यातली शेती आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्यानं तीन मुलींसह जीवनच संपवण्याचा प्रयत्न केल्याची ह्रदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यात घडलीय.... पोटच्या पोरांना विष पाजण्यापर्यंत हतबल झालेल्या या दाम्पत्याच्या कृत्यानं शेतक-याची दयनिय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

Apr 11, 2012, 12:42 PM IST

कर्जामुळे ६ महिन्याचा मुलीलाही पाजले विष

डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा आणि त्यातच कुटुंबात उडणारे खटके याला कंटाळून सांगलीच्या माळवाडीतल्या कुंभार कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कुटुंबातल्या नवरा बायकोनं स्वःत विष पिऊन तीन मुलींनाही विष पाजलं आहे.

Apr 10, 2012, 05:07 PM IST