train

पुन्हा झुरळांनी थांबविली रेल्वे!

रेल्वेनं प्रवास करतांना आपल्या सीटवर झुरळ आढळलं तर... नेहमीच्या प्रवासात झुरळांचं राज्य अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर पाहायला मिळतं. असाच काहीसा अनुभव मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांना आला. झुरळांच्या हल्ल्यानं त्रस्त झालेल्या प्रवाशांना त्यांच्यापासून मुक्ती तर मिळाली नाहीच, पण त्यामुळं गाडी मात्र रोखली गेली.

Aug 25, 2013, 08:33 AM IST

मुंबईत लोकलमध्ये सापडलीत जिवंत काडतूसे

जोगेश्वरी यार्डात उभ्या असलेल्या लोकलमध्ये जिवंत काडतुसं मिळाल्याची घटना घ़डलीय. सीटखाली ही काडतुसं मिळाली आहेत. याबाबतचा तपास सुरू आहे. सफाई कर्मचा-यालाही ही काडतुसं मिळाली आहेत.

Aug 16, 2013, 02:05 PM IST

वेगाची नवी ओळख : हायपरलूप

मानवाला वेगाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे आणि त्यातूनच ‘हायपरलूप’ची अनोखी कल्पना पुढं आली आहे.

Aug 15, 2013, 11:07 AM IST

चालत्या ट्रेनमध्ये चिमुरडीवर बलात्कार!

छत्तीसगडमध्ये अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार केला गेलाय. बलात्कारानंतर या चिमुरडीला बिलासपूर रेल्वे स्टेशनच्या जवळच ट्रेनमधून खाली फेकून देण्यात आलं.

Aug 12, 2013, 03:16 PM IST

मुंबईत ट्राफिक जॅम, कोठे तुंबलय पाणी?

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबईची घडी विस्कटून टाकलीय. शहर आणि उपनगरात बरसणा-या पावसामुळं हिंदमाता, परेल, दादर टीटी, गांधीमार्केट, सायन रोड नंबर 24, महेश्वरी उद्यान भागात पाणी साचलंय.

Jul 24, 2013, 12:10 PM IST

मुंबई जलमय, वाहतुकीची कोंडी

मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या पावसाने धुमाकुळ घातलाय. मुंबई आणि उपनगरात पाणीच पाणी रस्त्यावर दिसत आहे. पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसलाय. त्यामुळे मुंबई लोकल आणि फास्ट लेट झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. कोसळणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मध्य आणि हार्बरवरील गाड्या वेळेवर धावत आहेत.

Jul 24, 2013, 10:53 AM IST

मुंबई मुसळधार, हार्बर रेल्वे बंद

मुंबई काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीबरोबरच रस्ता वाहतुकीला बसला आहे. चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान मार्गावर पाणी साचल्याने हार्बरची वाहतूक बंद पडलेय. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ट्राफिक जामचा सामना सहन करावा लागत.

Jul 23, 2013, 03:54 PM IST

रेल्वेचे वेटींग तिकिट काढू नका?

बातमी रेल्वेच्या आरक्षणासंदर्भात. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करतांना जर आता तुमच्याकडे यापुढं कन्फर्म तिकीट नसल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. वेटींग तिकिट असेल तरीही ते ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे रेल्वेत नो एंट्रीच.

Jul 23, 2013, 11:01 AM IST

बदलापूरजवळ लोकलचा डबा घसरला

बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ कर्जतहून बदलापूरला येणाऱ्या लोकलचा महिलांचा डबा रूळावरून घसरला. दुपारी दोन वाजताच्या सुमाराला ही घटना घडलीय. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

Jul 21, 2013, 05:29 PM IST

दख्खनच्या राणीचा आज ८३ वा वाढदिवस....

पुणे मुंबई दरम्यान धावणारी दख्खनची राणी ८३ वर्षांची झाली आहे. पुणे तसेच मुंबईच्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनचा वाढदिवस आज पुणे स्टेशनवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Jun 1, 2013, 11:27 AM IST

रेल्वे वाय-फायने राहा हाय-फाय...

आजपासून रेल्वतर्फे लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ऑन बोर्ड वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येत आहे. सध्या ह्याची सुरूवात दिल्ली-कोलकता राजधानी एक्सप्रेसमधून करण्यात आली आहे. मंगळवारी रेल्वे मंत्री पवन कुमार बंसलच्या तर्फे या सुविधेचं उद्घाटन करण्यात येणार आहे.या वाई-फाईची सुविधा टेक्नो सेट कॉम कंपनीच्या सहयोगाने सुरू करण्यात आहे.

Apr 2, 2013, 02:56 PM IST

मध्य रेल्वेवर २२ नवीन फेऱ्या

मध्य रेल्वेने कर्जत-कसारा मार्गावर गुरूवार २८ मार्चपासून नव्या २२ लोकल फेऱ्या सुरू कणार आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवाशांची काही प्रमाणात सुटका होणार आहे.

Mar 26, 2013, 11:49 AM IST

मध्य रेल्वेची आणखी एक लोकल, सेमी फास्ट गाडीही

मध्य रेल्वेने गर्दीवर मात करण्यासाठी नामी युक्ती शोधली आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. दुस-या लोकलसाठी १५ एप्रिलचा मुहूर्त काढला आहे. तर दोन मार्गावर सेमी फास्ट गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

Mar 14, 2013, 12:26 PM IST

म.रे. ढेपाळली, प्रवाशांची तोडफोड, मारहाण

मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल अद्याप सुरूच आहेत. आजही लोकल लेट असल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी सकाळी आसनगाव स्थानकावर तोडफोड केली.

Jan 3, 2013, 09:46 AM IST

तुमची रेल्वे ट्रेन कुठे आहे, पाहा आता मोबाईलवर

९:१० झाले, अरे बापरे... माझी ट्रेन गेली असेल वाटतं.... असं आपलं नेहमीच होत असतं. आता मात्र तुमची ती चिंताही दूर होणार आहे.

Oct 13, 2012, 03:46 PM IST