दप्तराचं ओझं कमी का झालं नाही, मुंबई हायकोर्टानं सरकारला सुनावलं
शाळकरी मुलांच्या दप्तराचं ओझं अजूनही कमी झालं नसून याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं आज पुन्हा राज्य सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकारनं दप्तरांचं ओझं कमी करण्याबाबत अध्यादेश काढून देखील अजूनही तिच परिस्थिती आहे.
Sep 23, 2015, 09:07 PM IST...तर ऊर्जामंत्र्यांना फासावर लटकवा - सदाभाऊ खोत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 09:01 PM ISTप्रशासनाची चुकी, आईचा अपघाती मृत्यू आणि मुलीवरच गुन्हा
कल्याण-कर्जत महामार्गावर असलेल्या खड्ड्यात दुचाकी स्लीप झाल्यानं रीटा प्रसाद यांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरत असताना आता याप्रकरणी दुचाकी चालवणारी त्यांची मुलगी प्रीती हिच्यावर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या अपघातास जबादार असणाऱ्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची अंबरनाथ सीटिझन फोरमची मागणी आहे.
Sep 23, 2015, 08:45 PM ISTव्हिडिओ: भारतीयांच्या 'कंडोम' वापरवरील प्रतिक्रिया
कंडोम आणि गर्भनिरोधकाचा वापर करण्याचा विचार करणं आजच्या २१व्या शतकातही कठीण आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना अनेकांच्या रिअॅक्शन्स बघण्यासारख्या होतात.
Sep 23, 2015, 08:04 PM ISTसावधान! स्टील उद्योग बंद होण्याची भीती
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाडा इथल्या स्टील उद्योजकांच्या दहा सदस्यांच्या एका शिष्टमंडळानं बुधवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन इथं भेट घेऊन वाडा, जिल्हा पालघरच्या स्टील उद्योगांना स्वस्तदरानं वीज देण्याची मागणी केली.
Sep 23, 2015, 06:48 PM ISTऐश्वर्या बच्चन मुलीसह सिद्धीविनायकाच्या दर्शनाला!
Sep 23, 2015, 06:23 PM ISTपानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता वेगानं पुढे सरकत आहे. पानसरे यांच्या हत्येबाबत समीरचे दोन संभाषण पोलिसांना सापडले आहेत. मैत्रिण ज्योती कांबळे सोबत बोलतांना समीरनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितलं.
Sep 23, 2015, 05:57 PM ISTपोखरणला फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना, मेजर ध्रुव यादव शहीद
पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे मेजर ध्रुव यादव शहीद झाले आहेत. सांगण्यात येतंय की, टँक फायरिंग दरम्यान अपघातानं एका बॉम्बचा स्फोट झाल्यानं मेजर ध्रुव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची 'कोर्ट ऑफ इनक्वायरी'चे आदेश दिले गेलेत.
Sep 23, 2015, 04:30 PM IST७/११ साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना ३० सप्टेंबरला सुनावणार शिक्षा
७/११ साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना विशेष मोक्का न्यायालय येत्या ३० सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावणार आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आज न्यायालयात १२ पैकी ८ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची अशी मागणी केलीय. तर उर्वरित ४ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी विशेष मोक्का कोर्टात केलीय.
Sep 23, 2015, 03:58 PM ISTपत्रकार चाँद नवाब यांना कराची स्टेशनवर मारहाण, सलमानने केली चौकशी
पत्रकार चाँद नवाब यांना कराची स्टेशनवर मारहाण, सलमानने केली चौकशी
Sep 23, 2015, 09:28 AM ISTअबब! फोक्स वॅगन कंपनीत १ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा
जर्मनीतील सुप्रसिद्ध कार कंपनी फोक्स वॅगननं जगभरातील १ कोटींहून अधिक डिझेल गाड्यांमध्ये प्रदूषण चाचण्यांमध्ये फेरफार करु शकतील अशी उपकरणं लावल्याची कबुली दिली आहे. मात्र याचा फटका कंपनीच्या शेअर्सला बसला असून या नवीन खुलाश्यानंतर कंपनीच्या शेअर दरात तब्बल २० टक्क्यांनी घसरण झाली आहे.
Sep 22, 2015, 10:26 PM ISTराहुल गांधी पुन्हा सुट्टीवर, पाहा कुठे?
पुन्हा एकदा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्याची चर्चा आहे. राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर गेलेय. सूत्रांनुसार यावेळी राहुल एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. यावेळी राहुल गांधी लंडनला गेल्याचं कळतंय.
Sep 22, 2015, 09:34 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या शहरात पाण्यावरून रणकंदन, एकाची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:17 PM ISTपत्रकार चाँद नवाब यांना कराची स्टेशनवर मारहाण, सलमानने केली चौकशी
सलमान खानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान'मध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीनं ज्या रिपोर्टर चाँद नवाबची भूमिका साकारली. त्यांना आज पाकिस्तानात कराचीमध्ये रेल्वे स्टेशनवर मारहाण करण्यात आली. चाँद नवाब यांनी प्रसिद्धी मिळालेलं हेच कराचीचं रेल्वे स्टेशन आहे, जिथं आता त्यांना मारहाण झाली.
Sep 22, 2015, 07:37 PM ISTनेताजींनी चेक गणराज्यच्या महिलेसोबत सुद्धा लग्न केलं होतं?
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित १३ हजार पानांच्या ६४ फाइल्स पश्चिम बंगाल सरकारनं सार्वजनिक केल्या आहेत. त्याची तपासणी केल्यानंतर माहिती मिळालीय की स्वतंत्र भारतात त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी केली गेली. १९४५च्या विमान अपघातात खरंच सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला का? यावर अद्याप काहीच स्पष्टपणे सांगता येत नाहीय. आता प्रत्येक फाईलच्या अभ्यासानंतर नवी माहिती पुढे येतेय.
Sep 22, 2015, 06:26 PM IST