क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे काय ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 04:05 PM IST‘क्लस्टर डेव्हलपमेंट’वरील स्थगिती उठवली
जुन्या इमारतींच्या सामूहिक पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ या योजनेंतर्गत चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास पायाभूत सुविधांवर परिणाम होणार असल्याचे लक्षात घेऊन मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई शहरांविषयी आघात मूल्यांकन अहवाल (इम्पॅक्ट असेसमेंट) सादर झालेला असल्याने आता या शहरांसाठी योजनेवरील स्थगिती उठवावी, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दोन अर्जांद्वारे केली होती. तो अर्ज मान्य करत मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील स्थगिती उठवलीये. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील क्लस्टरचा मार्ग मोकळा झालाय.
Jun 9, 2017, 03:57 PM ISTठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
Feb 27, 2016, 12:48 PM ISTमुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकारच्या नगरविकास खात्यानं अधिसूचना जारी करून क्लस्टर पुनर्विकासाला मंजुरी दिलीय.
Sep 10, 2014, 08:51 AM ISTठाणे, कल्याण-डोंबिवलीत क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा
17 जूननंतर ठाण्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा झालाय. त्याचबरोबर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातही क्लस्टर डेव्हलमेट योजना लागू होण्याची शक्यता आहे.
Jun 12, 2014, 08:28 AM ISTक्लस्टर डेव्हलपमेंट : श्रेयासाठी ठाण्यात पोस्टरबाजी
ठाणे आणि नवी मुंबईमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना लागू झाल्या नंतर ठाण्यात राजकीय बॅनरबाजीला सुरुवात झालीये. राज्य सरकारने जरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून क्लस्टरला मंजुरी दिली असली तरी शहरातील बॅनरबाजीबाबत सर्वसामान्य ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 4, 2014, 09:31 AM ISTठाणे, नवी मुंबईसाठी `क्लस्टर डेव्हलपमेंट` मंजूर
राज्य सरकारने मुंबईतील 2000 सालापर्यंत झोपड्यांना सरकारनं संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे धोकादायक इमारतींचा विकास करणे शक्य होणार आहे. तसेच ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत क्लस्टर डेव्हलपमेंटलाही मंजुरी मिळाली आहे.
Feb 28, 2014, 11:06 PM ISTक्लस्टर डेव्हलपमेंट- राष्ट्रवादीच्या नेत्यांचं उपोषण मागे
क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरुन ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागं घेतलंय. मागील दोन दिवसांपासून ते उपोषणावर होते.
Oct 6, 2013, 07:05 PM ISTमनसे आंदोलनाला परवानगी नाकारली, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विना परवानगी आंदोलन केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
Oct 4, 2013, 02:25 PM IST