'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत

आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 28, 2018, 07:48 PM IST
'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत

न्यू यॉर्क: तुम्ही जर स्वस्त iPadच्या शोधात असाल तर, तुमच्यसाठी खुशखबर आहे. 'अॅपल' कंपनीने आपला सर्वात स्वस्तiPad लॉन्च केला आहे. त्यामुळे तुमचा स्वस्त आयपॅडचा शोध थांबण्याची शक्यता आहे. खरेतर या आयपॅडमुळे तुमच्याकडे अॅपलची वस्तूही येणार आहे. आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.

हा आयपॅड असून भारतात तो एप्रिल महिन्यात उपलब्ध होणार 

दरम्यान, अॅपल कंपनीचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अॅपलने आपला सर्वात स्वस्त iPad लॉन्च केला. या iPadबाबत सांगितले जात आहे की, आतापर्यंतच्या अॅपलच्या सर्व iPadमध्ये हा iPad सर्वात स्वस्त आहे. सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड फिनिश अशा तीन रंगात हा आयपॅड असून भारतात तो एप्रिल महिन्यात उपलब्ध होणार आहे. 

 विद्यार्थ्यांना हा iPad १९ हजार रूपयांत उपलब्ध

विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा आयपॅड अॅपलने लॉन्च केला आहे. ९.७ इंचाच्या या iPadमध्ये पेन्सिल सपोर्ट दिला आहे. iPadचे हे मॉडेल ३२ जीबी असून, त्याची किंमत २१ हजार ५०० रूपये असेल असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी हा iPad खास सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे.  विद्यार्थ्यांना हा iPad १९ हजार रूपयांत उपलब्ध करून दिला जाणार आहे.