राहुलकुमार , झी मीडिया, मुंबई : ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्रेडीट कार्ड लोनवर म्हणजेच ईएमआयवर शॉपींगची सुविधा कही कंपन्यांनी देऊ केली आहे.
दिवाळीत ग्राहकांचा खरेदीचा जोर आणि ऑनलाईन शॉपींगचा वाढता ट्रेण्ड लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे सणावाराला जोरदार शॉपींग करयची आहे आणि जवळ क्रेडीट कार्ड नाही. तर तुमचं काम अडणार नाही. कन्झुमर फायनन्स कंपन्य़ा, रिटेलर तसंच प्रेमेंट अँप्लिकेशन यांनी मिळून तुमची ही अडचण दूर केली आहे. त्यामुळे आता क्रेडीट कार्ड शिवाय ग्राहकांना इन्स्स्ंट कन्झुमर लोन सुलभ हफ्यात ग्राहकांना उपलब्ध करुन दिलं जात आहे. तेही कमीत कमी वेळ आणि कागदपत्रामध्ये.
तुम्हाला ऑनलाईन जर शॉपींग करायची आहे. तर फक्त तुमच्या बँक अकाऊंटशी लिंक असलेल्या आधार आणि पॅनकार्डची माहिती द्यायची आहे. जर स्वत: दुकानात जाऊन खरेदी करायची असेल तर या सोबत तीन महिन्यांचं बँक स्टेटमेंट द्यावं लागेल. ऑनलाईन शॉपींग करणाऱ्या ग्राहकांना क्रेडीट कार्ड शिवाय मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनीक गॅझेट या करता हे इन्सटंट लोन दिलं जातं.
दुकानात जाऊन खरेदी केलेल्या कुठल्याही ग्राहकोपयोगी वस्तूंवर हे लोन सहज उपलब्ध करुन दिल जातं. कंपन्या कर्जाची प्रक्रीया सुलभ करत आहेत. जेणेकरुन ग्राहकांची संख्या वाढेल आणि व्यवसायही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांनी अशा कुठल्याही इन्स्टंट लोन प्रपोजल मंजुर निवडण्याआधी सर्व अटी आणि शर्थी निट समजून घेतल्या पाहिजेत.
अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि कमी झालेली ग्राहकांनी संख्या वाढवण्याकरीत मॅन्युफॅक्चर आणि रिटेलर कमी व्याजाच्या या सुविधा आणताना दिसत आहेत.