सेन्ट फ्रांसिस्को : फेसबुकवर तुम्ही आता अधिक लोकांशी जोडू शकता. फेसबुकने क्लिक-टू-व्हाट्सअॅप हे एक नवीन बटण सुरू केले आहे. त्यामुळे जाहिरात देणारा एक अरबपेक्षा अधिक व्हाट्सअॅप युजर्सना जोडू शकतो.
हे बटण जाहिरातीत दिले जाईल. यामुळे व्हाट्सअॅप-फेसबुक जोडले जाईल. फेसबुकचे दोन अरबपेक्षा अधिक युजर्स आहेत. या फिचरमुळे तुम्ही एका क्लिक वरून जाहिरातीत जोडू शकता. त्यामुळे जाहिरात पाहणारे युजर्स व्हाट्सअॅप कॉल किंवा मेसेजने जाहिरातीशी जोडू शकतात.
हे फिचर हळूहळू लागू करण्यात येईल. सुरुवातीला हे उत्तर-दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियात लॉन्च करण्यात येईल.
फेसबुकचे प्रबंधक पंचम गज्जरने सांगितले की, अधिकतर लोक लहान व्यवसायांच्या प्रमोशनसाठी व्हाट्सअॅपचा वापर करतात. हा संपर्कात राहण्याचा सोपा आणि जलद पर्याय आहे. फेसबुकच्या जाहिरातींना क्लिक-टू-व्हाट्सअॅप बटण जोडल्याने व्यावसायिकांना नक्कीच फायदा होईल, असे ते म्हणाले.