सोन्याचा i phone X लॉन्च...

अॅपलच्या फोन्सची क्रेझ काही कमी नाही. पण आयफोन सर्वांनाच परवडणारा नाही.

Updated: Mar 15, 2018, 01:18 PM IST
सोन्याचा i phone X लॉन्च... title=

नवी दिल्ली : अॅपलच्या फोन्सची क्रेझ काही कमी नाही. पण आयफोन सर्वांनाच परवडणारा नाही. त्यात अॅपलचे नवनवे फोन्स बाजारात येत असतात.

गोल्ड आयफोन

iPhone X हा सर्वात महागडा फोन अॅपलने वर्षभरापूर्वीच लॉन्च केला. याची किंमत साधारण एक लाख आहे. आता रशियाच्या कॅविअॅर कंपनीने सोन्याचे बॅक कव्हर असलेला फोन बाजारात लॉन्च केला आहे. या सोन्याचे कव्हर असलेल्या फोनची किंमत iPhone X च्या जवळपास दुप्पट आहे. 

हैराण करणारी किंमत

२४ कॅरेट सोन्याने तयार केलेला हा फोन दोन रंगात बाजारात उपलब्ध आहे. क्लासिक गोल्ड आणि क्लासिक लिक्वेड गोल्ड. यांच्या किंमती अनुक्रमे २ लाख ९३ हजार आणि ३ लाख १३ हजाराहुन अधिक आहे.