TikTokला टक्कर देण्यासाठी Googleचं Tangi ऍप; जबरदस्त फिचर्स

हे ऍप नक्की आहे तरी काय?

Updated: Jan 31, 2020, 02:12 PM IST
TikTokला टक्कर देण्यासाठी Googleचं Tangi ऍप; जबरदस्त फिचर्स

नवी दिल्ली : व्हिडिओ मेकिंग ऍप टिक-टॉक गेल्या एका वर्षात चांगलंच प्रसिद्ध झालं. भारतात TikTok ऍप चाहत्यांची संख्याही मोठी आहे. घरबसल्या एका व्हिडिओमुळे अनेकांना प्रसिद्धीझोतात आणणाऱ्या TikTokला टक्कर देण्यासाठी आता आणखी एक नवं ऍप येण्याच्या तयारीत आहे. गूगलने एक नवं शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ऍप लॉन्च केलं आहे.  Google Tangi असं या ऍपचं नाव आहे. या ऍपला गुगलच्या Area 120 टीमने तयार केलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे सोशल व्हिडिओ शेअरिंग ऍप असून यावर छोटे व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात. यामधून लोक नव-नवीन शिकतील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

काय आहे टँगी ऍप (Google Tangi) ऍप -

टिकटॉकप्रमाणे Google Tangiवरही व्हिडिओ बनवता येऊ शकतात. व्हिडिओ बनवण्यासाठी ६० सेकंद मिळणार  आहेत. म्हणजे १ मिनिटांचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर शेअर करता येऊ शकतो. Google Tangi हे टिकटॉकचं लेटेस्ट वर्जन असल्याचं बोलता येईल. पण या दोन ऍपमध्ये काहीसा फरक आहे. 

टिकटॉक ऍपचा अधिकाधिक वापर मनोरंजनासाठी  केला जातो. तर Google Tangi ऍपचा वापर खास एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी होणार आहे.  या ऍपमध्ये व्हिडिओसाठी DIY, कुकिंग, लाईफस्टाईल, आर्ट, फॅशन आणि ब्यूटी यांसारख्या विविध प्रकार देण्यात आले आहेत. 

Google Tangi ऍपलच्या ऍप स्टोरमधून किंवा webवर फ्री डाऊनलोड करता येऊ शकतं. सध्या हे ऍप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध नाही. ऍन्ड्राईड यूजर्सला यासाठी काही वाट पाहावी लागणार आहे. ऍन्ड्राईड यूजर्ससाठी हे ऍप कधी उपलब्ध होईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कंपनीने हे ऍप यूरोपियन यूनियनशिवाय जगभरात लॉन्च केलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, केवळ मर्यादित युजर्सच या ऍपवर व्हिडिओ अपलोड करु शकणार आहेत. यूजर्सला या ऍपवर ऍक्टिव्ह होण्यासाठी वेटलिस्टमध्ये सामिल व्हावं लागणार आहे.

Google Tangiच्या वेबसाईटवर यूजर्सला त्यांचं इंटरफेस मिळेल. वेबसाईट सुरु झाल्यानंतर विविध प्रकारच्या व्हिडिओमधून एक प्रकार निवडावा लागेल. यूजर त्या व्हिडिओ पाहून स्वत:चा व्हिडिओ तयार करुन अपलोड करु शकतात.

या ऍपला गुगलने Teach and Give आणि  Tangible असं म्हटलंय. हे केवळ मनोरंजनात्मक ऍप नसून यात टूटोरियलही, शिकण्यासारख्या काही गोष्टी असणार आहेत. सध्या Tangi पायलट प्रोजेक्ट म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. याच्या संपूर्ण चाचणीनंतरच ते पूर्णत: बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे टिकटॉकप्रमाणे 'गुगल टँगी'लाही तितकीच प्रसिद्ध मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.