हार्ले डेविडसनने भारतात लॉन्च केल्या दोन दमदार बाईक्स

अमेरिकन कंपनी हार्ले डेविडसन बाईक कंपनीने बुधवारी आपल्या दोन नव्या बईक्स लॉन्च केल्यात. या बाईक्स नाव सॉफ्टेल डीलक्स आणि लो रायडर आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 1, 2018, 04:15 PM IST
हार्ले डेविडसनने भारतात लॉन्च केल्या दोन दमदार बाईक्स title=

नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी हार्ले डेविडसन बाईक कंपनीने बुधवारी आपल्या दोन नव्या बईक्स लॉन्च केल्यात. या बाईक्स नाव सॉफ्टेल डीलक्स आणि लो रायडर आहे.

कंपनीने याआधी भारतात फॅट बॉय या बाईकचं अ‍ॅनिव्हर्सरी एडीशन लॉन्च केलंय. या बाईकची एक्स-शोरूम किंमत १९.७९ लाख रूपये ठेवली गेलीये. 2018 Harley Davidson Softail Deluxe भारतात Softail रेंजची पाचवी बाईक आहे. 

तरूणांसाठी खास फीचर्स

भारतात नव्या Harley Davidson Softail Deluxe बाईकला लाईनअपमध्ये Fat Bob आणि Fat Boy यांच्यात रिप्लेस केलं जाईल.  हार्ली डेविडसन खासकरून क्रूजर बाईक आवडणा-या तरूणांवर लक्ष केंद्रीत करत आहे. सॉफ्टेल डीलक्स बाईकमध्ये कंपनीने पूल बॅक हॅंडलबार, क्रोम व्हिल्स, एलईडी हेडलाईट, डे-टाईम रनिंग लाईट, कीलेस इग्निशन, एबीएस इत्यादी फीचर्स दिले आहेत. 

हार्लेला रायडर बाईकचं इंजिन

हार्लेच्या लो रायडर बाईकला १९७० च्या स्टाईलने डिझाईन केलं गेलं आहे. पण यात फ्रेम लूक नवा देण्यात आलाय. इंजिन ते सायलेन्सरपर्यंत क्रोम आहे. लो रायडरमध्ये १७४६ सीसीचं इंजिन दिलं आहे. जे १४९ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. 

हार्ले डेविडसन सॉफ्टेल डीलक्सचं इंजिन

तेच दुस-या हार्ले डेविडसन सॉफ्टेल डीलक्समध्येही तेच इंजिन देण्यात आलंय. मात्र त्याची स्टाईल वेगळी आहे. तर फॅट बॉयच्या अ‍ॅनिव्हर्सरी एडिशान मॉडलमध्ये १८६८ सीसी इंजिन लावण्यात आलं आहे. 

किती असेल किंमत?

या नव्या दोन्ही बाईकची किंमती क्रमश: १७,९९ लाख रूपये आणि १२.९९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे. हे दोन्ही क्रूजर भारतात पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आली आहे. 

या बाईक्सच्या किंमतीत घट

कंपनीने ऑक्टोबर २०१७ मध्ये चार एमवाय१८ सॉफ्टेल मॉडेल सादर केलं होतं. हार्ले डेविडसनचे प्रबंध निर्देशक पीटर मॅकेंजी म्हणाले की, कंपनीने आपल्या रोड किंग, स्ट्रीट ग्लाईड स्पेशन, रोड ग्लाइड स्पेशन आणि सीव्हीओ टीएम लिमिटेड मॉडलच्या किंमतीत बदल केले आहेत. कंपनीच्या रोड किंग बाईक ज्या आधी २८ लाख रूपयात मिळत होती, ती आता २४ लाख रूपयात मिळणार आहे. सीवीओ लिमिटेड आधी ५४ लाख रूपयांना मिळत होती, ती आता ५० लाख रूपयांना मिळणार आहे.