Jio Bharat V2 Unlimited Calls: रिलायन्सने जिओ आणले आणि भारतातील मोबाईल तंत्रज्ञानाच्या युगात एक नवा अध्याय लिहिला गेला. देशाच्या कानाकोपऱ्यात, गावागावात जिओ पोहोचले. यामुळे भारतीयांची मोबाईल वापरण्याची पद्धतच बदलून गेली. परिणामी जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली. गेल्यावर्षी या कंपनीने 999 रुपयांचा परवडणारा जिओ भारत व्ही 2 (JioBharat V2) फोन लॉन्च केला होता. आता या कंपनीने या फोनसाठी नवा प्रिपेड प्लान आणला आहे. याअंतर्गत ग्राहकांना 28जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग देण्यात येतंय. काय आहे हा प्लान? सविस्तर जाणून घेऊया.
आकाश अंबानी यांच्या कंपनीने जिओ भारत फोनसाठी एक नवा प्लान आणला आहे. याची किंमत 234 रुपये आहे. या प्लानमध्ये 28 जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉल आणि 28 दिवसांसाठी 300 एसएमएस मिळणार आहेत. हा प्लान 56 दिवसांसाठी वॅलिड असून यासोबत जिओ सावन आणि जिओ सिनेमाचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
भारतातील सर्वात स्वस्त फोन म्हणून जिओ भारत 2 ओळखला जातो. यामध्ये यूजर्सना सोप्या रितीने यूपीआय, जिओ सिनेमा आणि इतर सेवांचा लाभ घेता येतो.
जिओ भारत फोनच्या ग्राहकांसाठी आतापर्यंत केवळ 2 प्लान होते. यामध्ये पहिला प्लान 123 रुपयांचा आणि दुसरा प्लान 1234 रुपयांचा आहे. 123 रुपयांचा प्लान केवळ 28 दिवसांसाठी तर 1234 रुपयांचा प्लान हा 336 दिवसांसाठी आहे.
मार्केटमधील जिओच्या एकहाती सत्तेला अदानी ग्रुप सुरुंग लावणार का? अशी शक्यता निरमाण झाली आहे. कारण गौतम अदानी यांची कंपनी मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. भारतामध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव 20 मेपासून सुरु होणार आहे. DoT ने यासंदर्भात त्यांना 8 मार्चला नोटीसदेखील पाठवली आहे. अदानी ग्रुपचे सर्व्हेसर्व्हा गौतम अदानी यांनी एका मिटींगमध्ये स्पेक्ट्रम लिलावात सहभाग घेण्याचे संकेत दिले आहेत. आम्ही यात सहभागी होत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. असे झाल्यास गौतम अदानी 5जी इंटरनेट सर्व्हिसवर अधिकार प्राप्त करु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच फास्ट इंटरनेट सर्व्हिसमध्ये अदानी ग्रुपची थेट एन्ट्री होऊ घातली आहे.