लाँचिंगपूर्वीच Maruti च्या 28 किमी मायलेज देणाऱ्या कारची मागणी वाढली, काय आहे खास जाणून घ्या

भारतात मारुतीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनी दरवर्षी नवनवे मॉडेल लाँच करत असते. दोन महिन्यांत 50,000 हून अधिक बुकिंग मिळाले. 

Updated: Sep 7, 2022, 01:53 PM IST
लाँचिंगपूर्वीच Maruti च्या 28 किमी मायलेज देणाऱ्या कारची मागणी वाढली, काय आहे खास जाणून घ्या title=

Grand vitara bookings: भारतात मारुतीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनी दरवर्षी नवनवे मॉडेल लाँच करत असते. काही गाड्यांचं अपग्रेटेड मॉडेलही आणत असते. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) लवकरच एक नविन कार लाँच करणार आहे. कंपनीने ग्रँड विटाराची (Grand vitara) झलक आधीच दाखवली असून बुकिंगही सुरू झाले आहे. ही कंपनीची मध्यम आकाराची एसयूव्ही असून जुलैमध्ये सादर करण्यात आली होती. या  एसयूव्ही मध्ये तुम्हाला 28 किमीपर्यंत मायलेज मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत 50 हजारांहून अधिक ग्राहकांनी गाडीची बुकिंग केली आहे. 

आगामी ग्रँड विटारा मारुती सुझुकीचे भारतातील पहिले मजबूत हायब्रिड वाहन आहे. ग्रँड विटारा दोन इंजिन पर्यायांसह आहे. यात ई-सीव्हीटीसह मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह नवीन 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. दुसरे 1.5-लिटर माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड एटीशी जोडलेले आहे.

ग्रँड विटाराच्या माइल्ड-हायब्रिड मॅन्युअल प्रकारात AWD देखील  उपलब्ध असेल. कंपनी हायब्रिड प्रकारात 27.97 kmpl च्या मायलेजचा दावा करते. नवीन मारुती सुझुकीच्या ग्रँड विटाराच्या किमती या महिन्याच्या अखेरीस जाहीर केल्या जातील. गाडीची किंमत 9.50 लाख ते 18 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे.

रिपोर्ट्सनुसार,  ग्रँड विटाराला दोन महिन्यांत 50,000 हून अधिक बुकिंग मिळाले. याशिवाय, ग्रँड विटाराच्या एकूण बुकिंगपैकी सुमारे 45 टक्के बुकिंग त्याच्या मजबूत हायब्रिड व्हेरियंटला मिळाले आहे. या वाहनाची थेट स्पर्धा Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या कारशी होणार आहे.