Radhika Merchant Ambani Is Lucky For Mukesh Ambani: मुकेश अंबानींसाठी त्यांची धाकटी सून राधिका मर्चंड अंबानी फारच लकी ठरली आहे. एकीकडे राधिका आणि अनंत अंबानींने 12 जुलै रोजी सप्तपदी घेतल्या आणि दुसरीकडे मुकेश अंबानींसाठी टेलॉकॉम रेग्युलेट्री अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने त्यांना एक गुड न्यूज दिली आहे. ट्रायने मुकेश अंबानींच्या मालकीची रिलायन्स जिओ कंपनीने नवीन वापरकर्ते मिळवणाऱ्या सेवापुरवठा कंपन्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. रिलायन्स जिओने एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या दोन्ही प्रमुख विरोधक कंपन्यांना मागे टाकलं आहे.
ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओने 2024 च्या मे महिन्यामध्ये 21 लाख 90 हजार नवीन ग्राहक वायरलेस सेवेच्या माध्यमातून जोडले. याच कालावधीमध्ये भारतीय एअरटेल कंपनीने 12 लाख 50 हजार नवे ग्राहक आपल्या सेवेशी जोडले. या दोन्ही कंपन्यांनी सातत्याने शेअर मार्केटमध्ये उतरंडीला लागलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीला ग्राहकांनाही मोठा धक्का दिला आहे. या कंपनीचे तब्बल 9 लाख 24 हजार ग्राहकांनी आपला नंबर इतर सेवापुरवठादार कंपनीकडे पोर्ट केला आहे.
ट्रायने दिलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यामध्ये 1 कोटींहून अधिक लोकांनी आपली मोबाईल कंपनी बदलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्राने मे महिन्यामध्ये 1 कोटी 20 लाख लोकांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी अर्ज केला आहे. या अर्जाच्या माध्यमातून विद्यमान कंपनीमधून आपला फोन नंबर तोच ठेऊन दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारता येते. एप्रिल महिना संपेपर्यंत ट्रायला मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यासाठी 97.36 कोटी अर्ज मिळाले आहेत. हा आकडा मे महिन्याच्या शेवटापर्यंत 98.56 कोटींपर्यंत पोहचला होता.
नक्की वाचा >> 'मी अशाच लग्नांना जाते जिथे..', तापसीने सांगितलं अंबानींच्या लग्नाला न जाण्याचं रंजक कारण; उत्तराची चर्चा
रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार जिओकडे एप्रिल महिन्यामध्ये 47.24 कोटी ग्राहक होते. मे महिन्यामध्ये हा आकडा 47 कोटी 46 लाख इतका झाला आहे. दुसरीकडे व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या घसरुन 21 कोटी 81 लाखांवर पोहोचली आहे. भारतामध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेच्या सबस्क्रायबर संख्येमध्येही एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात 0.72 टक्क्यांनी वाढली आहे. मे महिन्यामध्ये देशात एकूण 93 कोटी 50 लाख ब्रॉडबॅण्ड सब्सक्राइबर्स आहेत.
नक्की वाचा >> 49 वर्षीय अभिनेता 20 वर्षीय अभिनेत्रीला करतोय डेट? पार्टीतला फोटो Viral; Ex-Wife म्हणाली, 'ती आमच्या मुलीपेक्षा..'
दरम्यान, मुंबईमधील लग्न सोहळा उरकल्यानंतर अंबानी कुटुंबीय लग्न सोहळ्यातील शेवटच्या काही कार्यक्रमांसाठी लंडन गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मार्च महिन्यामध्ये गुजरातमधील जामनगर येथे या विवाहसोहळ्यापूर्वीचा पहिला कार्यक्रम पार पडला होता. तेव्हापासून जवळपास चार महिन्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या सोहळ्यातील कार्यक्रम पार पडले.