पुन्हा जिओचा नवा प्लॅन, आता रोज मिळणार ५ जीबी डेटा

जिओने नुकताच त्यांच्या प्लॅन्समध्ये बदल केला आहे. रोज नवनवीन ऑफर्स दिले जात आहेत. आता जिओने आपले टेरिफ प्लॅन्स लाईव्ह केले आहेत.

Updated: Jan 12, 2018, 08:30 AM IST
पुन्हा जिओचा नवा प्लॅन, आता रोज मिळणार ५ जीबी डेटा title=

नवी दिल्ली : जिओने नुकताच त्यांच्या प्लॅन्समध्ये बदल केला आहे. रोज नवनवीन ऑफर्स दिले जात आहेत. आता जिओने आपले टेरिफ प्लॅन्स लाईव्ह केले आहेत.

आता जिओ ग्राहकांना या प्लॅन्सचा फायदा मिळेल. जिओने काही दिवसांपूर्वी आपल्या ८ नवीन प्लॅन्सची घोषणा केली होती. त्यावेळी ५०९ रूपये आणि ७९९ रूपयांच्या प्लॅन्सची माहिती दिली गेली नव्हती. जिओकडे आता १९ रूपयांपासून ते ९,९९९ रूपयांपर्यंतचे प्लॅन्स आहेत. 

हे आहेत पॉप्युलर प्लॅन्स

रिलायन्स जिओच्या पॉप्युलर ५०९ रूपयांच्या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी ३ जीबी डेटा दिला जात आहे. एकूण डेटा ८४ जीबी आहे मात्र, याची व्हॅलिडीटी ४९ दिवसांवरून २८ दिवस करण्यात आली आहे. त्यासोबत ७९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी ५ जीबी डेटा दिला जाणार आहे. याआधी या प्लॅनमध्ये ३ जीबी डेटा दिला जात होता. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. 

छोट्या रिचार्जमध्ये मोठा फायदा

जिओच्या छोट्या रिचार्जबद्दल सांगायचं तर कंपनीकडे १९ रूपये, ५२ रूपये आणि ९८ रूपयांचे प्लॅन आहेत. १९ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी १ दिवसाची आहे आणि यात ०.१५ जीबी डेटा दिला जाणार. ५२ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी ७ दिवस असून यात १.०५ जीबी डेटा दिला जाणार आणि ९८ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी १४ दिवस आहे ज्यात २.१ जीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, जिओ अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन आणि एसएमएसचाही फायदा मिळेल. 

या प्लॅन्सची किंमत झाली कमी

जिओकडे १९९ रुपये, ३९९ रूपये, ४५९ रूपये आणि ४९९ रूपयांचे प्लॅन्स आहेत. आता या प्लॅन्सची ५० रूपयांपर्यंत किंमत कमी करण्यात आली आहे. 

या प्लॅन्सनेही होईल फायदा

जिओच्या ३४९ रूपयांच्या, ३९९ रूपयांच्या आणि ४४९ रूपयांच्या प्लॅन्समध्ये प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा दिला जात आहे. पण या लॅन्सची व्हॅलिडीटी वेगवेगळी आहे. ३४९ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी ७० दिवस, ३९९ च्या प्लॅनची ८४ आणि ४४९ रूपयांच्या प्लॅनची ९१ दिवस व्हॅलिडीटी आहे.

या प्लॅन्समध्ये मिळतो जास्त डेटा

जिओचे चार नवीन प्लॅन्स १९८ रूपये, ३९८ रूपये, ४४८ रूपये आणि ४९८ रूपयांचे आहे. यात १.५ जीबी डेटा मिळतो. यात १९८ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची, ३९८ रूपयांची व्हॅलिडीटी ७० दिवसांची, ४४८ रूपयांची ८४ दिवस आणि ४९८ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी ९१ दिवसांची आहे.