Carnac Bridge demolition: आजपासून (19 नोव्हेंबर) सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम (Carnac Bridge)सुरु करण्यात येणार आहे. याकामासाठी मध्य रेल्वेच्या (central railway) मार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे. तसेच ठाण्यातील कोपरी ब्रिजच्या (kopari bridge) कामानिमित्त हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई विभागात पुलाच्या कामासाठी 26 तासांचा ब्लॉक (central block) घेण्यात आला. त्यामुळे 19 व 20 नोव्हेंबर रोजी मुंबईला येणाऱ्या रेल्वे (local cancel) रद्द केल्या आहेत. परिणामी सीएसएमटी-भायखळा, वडाळादरम्यान लोकल फेऱ्या चालविण्यात येणार नाहीत. ब्लॉककाळात दररोज धावणाऱ्या 1 हजार 810 लोकल फेऱ्यांपैकी अप आणि डाऊनला जाणाऱ्या एकूण 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आज आणि उद्यामध्ये फक्त 714 लोकल फेऱ्या धावणार आहेत. भायखळा, परेल, कुर्ला, दादर या स्थानकांतून ठाणे, कल्याण तसेच कर्जत- कसारा या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. याशिवाय, हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल आणि गोरेगाव या स्थानकादरम्यान लोकल धावतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने 19 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 पासून 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 6.30 पर्यंत 47 जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा : विकेंडला Local लॉकडाऊन! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
तसेच यात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वेचा देखील समावेश आहे. तर काही रेल्वे मुंबईला न जाता पुण्यापर्यंत धावणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास सुरु राहणारे हेल्पडेस्क देखील सुरु केले आहे. प्रवाशांना आवश्यकता भासली तर पुणे स्थानकावरून एसटी (st bus) गाड्या सोडण्याचे देखील नियोजन झाले आहे.