'नशिबाने तो बचावला, पण...'; तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा VIDEO आव्हाडांनी आणला समोर

ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात भररस्त्यात हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची माहिती पोस्टमधून दिली आहे. यासोबत त्यांनी आरोपींचा हल्ल्याआधीचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ठाणे पोलिसांची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 10, 2023, 12:56 PM IST
'नशिबाने तो बचावला, पण...'; तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा VIDEO आव्हाडांनी आणला समोर title=

Thane Crime : ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात भररस्त्यात हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची माहिती पोस्टमधून दिली आहे. यासोबत त्यांनी आरोपींचा हल्ल्याआधीचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ठाणे पोलिसांची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण इन्स्टाग्राम लाईव्हाद्वारे त्याच्या मित्रासोबत बोलताना दिसत आहे. यावेळी तो आज त्यांच्यासाठी एक मर्डर गिफ्ट आहे, त्यांच्यासाठी एक मर्डर करायची आहे, असे म्हणताना दिसत आहे. या तरुणासोबत आणखी एकाचा आवाज देखील मागून ऐकू येत आहे. 

काय म्हटंलय जितेंद्र आव्हाडांनी?

"परवा रात्री नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चंदनवाडी येथे कुणाल चापले या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर तीन वार करण्यात आले आहेत.  नशिबाने तो बचावला.  पण,  वार जर खाली झाला असता, तर कुणाल चापले हा तरूण जीवानिशी गेला असता. सोबत मी त्या गुन्हेगारांचे व्हिडीओ टाकतोय. ठाणे पोलिसांची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही,  हे या वरुन स्पष्ट दिसतंय. खुनी हल्ला करणाऱ्या मुलांना शोधण्याची कुठलीही तसदी नौपाडा पोलीस घेत नाहीत. ते गुंड जर, उघडपणाने म्हणणार असतील की अजून एक मर्डर करायचा आहे. तर लोकांनी काय करायचे. कायदा आपल्या हातात घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ठाणे पोलीस आयुक्तांनी याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी. खुनी हल्ला करणाऱ्या या गुन्हेगारांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घ्यावे," असे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

ठाण्यात तलवारीने तरुणाची हत्या

ठाण्याच्या कासारवडवली येथील आनंद नगर भागात भररस्त्यात कारमधून बाहेर खेचत तलवारीने वार करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तलवारीने वार करून हत्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. सतीश पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला. मृत सतीश पाटीलचा इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय होता. तो कासारवडवली येथील आनंद नगर नाका येथे कारने आला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले. या हल्ल्यानंतर सतीश रक्ताच्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही हत्या पूर्ववैमानस्यातून अथवा आर्थिक व्यवहारातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.