पाकिस्तानमध्ये तालिबान्यांचा अंदाधुंद गोळीबार, १२ ठार

ाकिस्तानच्या वायव्य भागातल्या पेशावरमध्ये एका कृषी प्रशिक्षण संस्थेत तिघा बुरखाधारी तालिबानी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. 

Updated: Dec 1, 2017, 11:29 PM IST
पाकिस्तानमध्ये तालिबान्यांचा अंदाधुंद गोळीबार, १२ ठार  title=

पेशावर : पाकिस्तानच्या वायव्य भागातल्या पेशावरमध्ये एका कृषी प्रशिक्षण संस्थेत तिघा बुरखाधारी तालिबानी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात १२ जण ठार झाल्याचे समजते.

मृतांमध्ये सहा विद्यार्थी, पाच नागरिक आणि एका सुरक्षा जवानाचा समावेश आहे. तिघेही दहशतवादी बुरखा पांघरून, ऑटो रिक्षात बसून आले होते. ईदच्या निमित्तानं या संस्थेला सुट्टी होती. मात्र तिथल्या वसतीगृहात सुमारे ७० विद्यार्थी राहतात.

हे तिघेही दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत, वसतीगृहात शिरले आणि त्यांनी हे हत्याकांड घडवलं. या तिघाही दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी अखेर कंठस्नान घातलं.