53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं...

एका 53 वर्षीय महिलेने आपल्याच 31 वर्षं मुलाशी लग्न केलं आहे. आमची मनं जुळत असल्याने एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही असं या महिलेचं म्हणणं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 27, 2023, 07:05 PM IST
53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं... title=

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं....पण खरंच असं असतं का? प्रत्येकाच्या प्रेमाची एक व्याख्या ठरलेली असते. म्हणजे प्रत्येकाने प्रेमात पडतानाही काही मर्यादा घातलेल्या असतात. पण काहींसाठी प्रेम करताना या मर्यादा महत्त्वाच्या नसतात. मर्यादा ओलांडून ते या प्रेमाच्या जगाचा आनंद घेत असतात. पण जर एखाद्या महिलेला आपल्याच मुलाशी प्रेम झालं तर....आता यावर प्रत्येकाची वेगळी प्रतिक्रिया असू शकते. पण रशियामध्ये अशी घटना घडली आहे. महिलेचं हे प्रेम फक्त तेवढ्यावरच थांबलं नाही, तर तिने आपल्याच मुलाशी लग्नही केलं. हा मुलगा तिचा सख्खा नसून, सावत्र आहे. पण या लग्नामुळे तिच्यावर जगभरात पळण्याची वेळ आली आहे. 

रशियात एका महिलेने आपल्यापेक्षा वयाने 31 वर्षं छोट्या सावत्र मुलाशी लग्न केलं आहे. पण लग्न केल्यानंतर ती जगभरात फिरत आहे. आपल्या इतर पाच मुलांचाही ताबा आपल्याकडे राहावा यासाठी आपण मॉस्कोतून पळत असल्याचं तिने सांगितलं आहे. 

रशियामधील 53 वर्षीय संगीतकार ऐसीलू चिज़ेव्स्काया मिंगालिम यांनी आपल्याच 22 वर्षीय सावत्र मुलाशी लग्न केलं आहे. त्यांची ही प्रेमकहाणी ऐकल्यानंतर बालकल्याण विभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत. आई-मुलाच्या या जोडप्याने एकमेकांसह जगण्या मरण्याच्या शपथा घेतल्या आहेत. 

स्थानिक मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिंगलिमने डॅनियलला तो 14 वर्षांचा असल्यापासून सांभाळलं आहे. तिने एका अनाथाश्रमातून त्याला दत्तक घेतलं होतं. सांगितलं जात आहे की, मिंगलिम येथेच डॅनियलला संगीताची शिकवण देत होती. तेव्हा त्याचं वय फक्त 13 वर्षं होतं. 

पण डॅनियलसह लग्न केल्यानंतर मिंगलिमवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिंगलिमने देखभाल करण्यासाठी दत्तक घेतलेल्या इतर 5 मुलांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. यामध्ये चार मुली आणि एक मुलगा आहे. मिंगलिमचं वागणं पाहती ती या मुलांचा योग्य सांभाळ करु शकणार नाही असं या अधिकाऱ्यांचं मत आहे. 

स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना मिंगलिमने सांगितलं की, डॅनियलला अनाथाश्रमातून घरी आणल्यापासून आपला रोमान्स सुरु झाला. "आमचं नात एकदम योग्य आहे. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यालाही हे नातं मान्य असून, आमची मनं एकदम जुळत आहेत," असं मिंगलिमचं म्हणणं आहे.

स्थानिक माध्यमांनुसार, तातारस्तान टीव्ही स्टेशनच्या एका फिल्म प्रोजेक्टदरम्यान अनाथ मुलांची भेट घेतल्यानंतर मिंगलिमने मुलांना दत्तक घेण्यास सुरुवात केली होती. मिंगालिम सध्या तातारस्तानमधून पळून जाण्याची योजना आखत आहे. आपल्या नव्या पतीलाही सोबत नेण्याची तिची इच्छा आहे. मॉस्कोत जाऊन आपला पती आणि मुलांसह तिथे संसार थाटावा असं तिचं स्वप्न आहे.