प्रेमविवाहानंतर दोनच आठवड्यात पत्नीला मोठा झटका, नवऱ्याच्या सत्याने बदललं आयुष्य

त्यांच्या भावी जोडीदाराने खास पद्धतीने लग्नासाठी प्रपोज करतो आणि ती त्यांच्यासाठी महत्वाची व्यक्ती असल्याची जाणीव करुन देतो.

Updated: Jan 20, 2022, 03:42 PM IST
प्रेमविवाहानंतर दोनच आठवड्यात पत्नीला मोठा झटका, नवऱ्याच्या सत्याने बदललं आयुष्य title=

पॅरेस : लग्न हा प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास क्षण असतो. यानंतर नवरा बायको आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात करतात. मुलीसाठी हा क्षण जास्त महत्वपूर्ण असतो, कारण तिला नवा लोकांमध्ये, नव्या ठिकाणी जाऊन आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करायची असते. आता असा ट्रेंड आला आहे की, बहुतेक महिलांना त्यांच्या भावी जोडीदाराने खास पद्धतीने लग्नासाठी प्रपोज करतो आणि आपण आपल्या होणाऱ्या बायकोवरती किती प्रेम करतो हे व्यक्त करतो. परंतु एका महिलेसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे.

एका फ्रेंच महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आपली कहाणी सांगितले आहे, जी फारच धक्कादायक आहे. ती म्हणाली की तिच्या जोडीदाराने तिला एका खास पद्धतीने कसे प्रपोज केले. मात्र, लग्नाच्या दोनच आठवड्यांनंतर तिला मोठा धक्का बसला.

सेल्सी जोन्स नावाच्या महिलेने सांगितले की, "माझ्या प्रियकराने डिस्नेलँड पॅरिससमोर मला एका खास पद्धतीने प्रपोज केले. ज्यामुळे मला त्याचं माझ्यावरील प्रेम दिसलं आणि मी लगेच त्याला होकार कळवला. परंतु कोविडमुळे आमचे लग्न काही काळ पुढे ढकलण्यात आले होते. लवकरच आमच्या लग्नाची वेळही आली. मला माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत होते. त्याला देखील त्याचे उर्वरित आयुष्य माझ्यासोबत घालवायचे आहे, असे तो म्हणाला. तो रोज म्हणायचा की मी खूप सुंदर आहे आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो."

सेल्सी जोन्स पुढे म्हणाली, "मी स्वतःला खूप नशीबवान समजत होतो की, मला इतका स्पेशल नवरा मिळाल. पण लवकरच माझ्या स्वप्नातील जग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. लग्नानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर माझ्या पतीने मला सांगितले की, त्याचं माझ्यावर आता प्रेम नाही. तो म्हणाला की, त्याला आता माझ्याबद्दल काहीच वाटत नाही."

व्हिडिओमध्ये या गोष्टी सांगताना सेल्सीही भावूक झाली. स्वत:वर नियंत्रण ठेवत सेल्सीने सांगितले की, लग्नानंतर तिला मिळालेल्या या फसवणुकीने ती पूर्णपणे तुटली आहे आणि तिचा आता कोणावरही विश्वास नाही.

सेल्सी म्हणाली, "मला वाटत नाही की मी आता कोणावरही विश्वास ठेवू शकेल. इतके खास क्षण जगल्यानंतर या सगळ्या गोष्टी मला माझ्याबद्दल नकारात्मक गोष्टींची आठवण करुन देतात. कदाचित मी आता आयुष्याबद्दल नीट विचार करू शकणार नाही. मी पुन्हा कधीच लग्न करणार नाही. मला समजत नाही की कोणी कोणाशी असे कसे करू शकते. मला वाटते की मी सर्वात मोठा मूर्ख आहे."

सेल्सीच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट देखील आल्या आहेत. सेल्सी सारखा प्रकार आणखी काही लोकांच्याबाबतीत देखील घडला आहे आणि त्यांनी सेल्सीसोबत तो शेअर देखील केला. एका व्यक्तीने लिहिले, 'माझ्यासोबतही असेच घडले. आता मी दुसऱ्या कोणावर कसा विश्वास ठेवू? वयाच्या ३६ व्या वर्षी मी पुन्हा आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे, हे विचित्र आहे. तर दुसर्‍याने लिहिले, 'माझ्यासोबतही असे घडले आहे, मी तुमचे दुःख समजू शकतो, हे खूप वेदनादायक आहे.'