World News: डॉक्टर नको, वकील नको पण करोडपतीच पाहिजे! महिलेची अजब अट ऐकून तुम्हाही चक्रावल...

सध्या अशाच एका मुलीची गोष्ट समोर आली आहे. ती पाहून तुम्हाला तिची लव्ह स्टोरी, तिचे विचार आणि तिचं आयुष्य जगण्याची पद्धत आवडल्या वाचून राहणार नाही. 

Updated: Nov 5, 2022, 03:10 PM IST
World News: डॉक्टर नको, वकील नको पण करोडपतीच पाहिजे! महिलेची अजब अट ऐकून तुम्हाही चक्रावल...  title=

Girl to want to date only Billionaires: जगातील प्रत्येक व्यक्ती ही खूप वेगळी असते आणि मुख्य म्हणजे ती कायम स्वतःसाठी आयुष्य जगत असते. आपणही कायम असाच विचार करतो की आपणही किती वेगळं आयुष्य जगू शकतो आणि त्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील असतो. मग ती आयुष्यातील कुठलीही गोष्ट असो आपण आपल्या आयुष्यात सतत काहीतरी वेगळं शोधायचा प्रयत्न करतो. मग प्रेमाच्या बाबतीत ते वेगळं का असावं? आपल्यालाही आपला वेगळा जोडीदार निवडण्याचा पुर्ण अधिकार (Life partners) आहे. आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्नही सुरू करतो. कुणाला असा मुलगा आवडतो किंवा कुणाला तशी मुलगी आवडते. (american woman amber lucas started dating billionaires)

सध्या अशाच एका मुलीची गोष्ट समोर आली आहे. ती पाहून तुम्हाला तिची लव्ह स्टोरी, तिचे विचार आणि तिचं आयुष्य जगण्याची पद्धत आवडल्या वाचून राहणार नाही. अमेरिकेच्या अंबर लुकासने असेच काही केले, तिच्या औदार्याचा फायदा घेणार्‍या पुरुषांशी डेटिंग (Datings) करून तिला कंटाळा आल्यावर तिने मोठ्या करोडपतींना (Billionaires) डेट करायला सुरुवात केली.

तिची कहाणी शेअर करताना अंबर म्हणाली, “गेल्या वर्षी मी माझा पुष्कळ वेळ माझ्या आयुष्याचा विचार करत घालवला. पण आता मला समजले की मला माझ्या आयुष्यातील एक गोष्ट आवर्जून बदलायची आहे आणि ती म्हणजे मी कोणत्या प्रकारच्या, विचारांच्या पुरूषांशी डेटिंग करते. मी आत्तापर्यंत ज्यांना डेट केलं त्यांची मनोवृत्ती मला फारच भावनिकदृष्ट्या ढासळलेली आणि वृत्ती फारच बेफिकीर वाटली. म्हणून मी त्यांना सोडलं. यांच्यापैंकी अनेक जण माझ्याकडे पैसे मागायचे. काही जण तर इतके दुर्बल होते की आपल्या बाईकींगवर (Baking) तर ते इतके पैसे खर्च करायचे म्हणून त्यांना त्यांचे घरभाडेही देणे जमत नव्हते. 

viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!

अंबर म्हणाली, "अशा अनेक अनुभवांनंतर, माझ्यामध्ये प्रौढ पुरुषांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची आणि खुल्या मानसिकतेने (Mental Stress) नातेसंबंध निर्माण करण्याची इच्छाच झाली नाही. मला अशी व्यक्ती हवी होती जिला जीवन उमजेल आणि जीवन जगण्याची कला अवगत असेल. मला अशा माणसाला डेट करायचे होते. खरंतर मला माझ्या जुन्या नात्यातल्या वेदना विसरायच्या होत्या. 

अशा नवरा पाहिजे...

अंबर म्हणते, "मी माझ्याच शहरातील सॅन फ्रान्सिस्को येथील एका माणसाला भेटले. तो खूप हुशार होता. त्याने त्याचा कुत्रा एक आणला, जो मला खूप आवडला. आम्ही पुन्हा एकमेकांना भेटलो नाही. मग मी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करणार्‍या एका व्यावसायिकाला डेट (Relationships) केले. तो 53 वर्षांचा होता आणि तो माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा होता. आम्ही एकमेकांना अनेकदा डेट केले. एके दिवशी मी तिला सांगितले की मी फ्रान्सला जात आहे. मी गमतीने त्याला विचारले तुला माझ्यासोबत जायचे आहे का? तो त्यावर काहीच म्हणाला. 

मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!

काय आहेत अंबरची मतं? 

अंबरच्या म्हणण्यानुसार, "माझ्या आधीच्या नात्यात, मला सर्व काही स्वतःहून करावे लागले. स्वतःचे पैसे खर्च (Money) करावे लागले आणि प्रत्येक प्रवासाचा प्लॅन मलाच बनवावा लागला. आता माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे ज्याने मला फ्रान्सला जाण्याची किती आवड आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो मला ती आवड पूर्ण करण्यास मदत केली. त्यानं मला बिझनेस (Business Class) क्लासची तिकीट बुक करून दिली. मला तो नेहमी क्रिडट कार्ड (Credit Card) देतो. माझा सगळा खर्च करतो.