मुंबई : आईसाठी प्रत्येक मुल सारखंच असतं. ती आपल्या बाळावर जीवापाड प्रेम करत असते. आपलं मुलं कितीही मोठं झालं तरी आईसाठी ते लहानच असतं. आई आपल्या मुलांवर किती प्रेम करते, हे कोणत्याही आईला वेगळं सांगायला किंवा त्याचा पुरावा द्यायला नको. कारण आई सारख आपल्या मुलांवर प्रेम या जगातील कोणतीही व्यक्ती करत नाही. मुलांसाठी देखील आपली आई प्रिय असते. लहान मुलं तर आपल्या आई शिवाय कुठे ही राहू शकत नाहीत. त्यांना सतत आपल्या अवती-भवती आई हवीच असते.
परंतु एका मुलासोबत एक धक्कादायक गोष्ट घडली. त्याने जेव्हा आपल्या आईचं नाव गुगलवर सर्च केलं, तेव्हा त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. आता तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल की, त्या मुलाने आपल्या आईबद्दल नक्की असं काय पाहिलं असेल, ज्यामुळे त्याला धक्का बसला.
खरं तर यूकेच्या लीड्समध्ये राहणारा 30 वर्षीय रीके मॅडिकसोबत (Reece Maddick) ही घटना काही वर्षांपूर्वी घडली होती.
रीके मॅडिक आणि त्याचा भाऊ ऍलन दोघे ही लहान असताना कॅरोल मॅडिक यांनी दत्तक घेतले होते. परंतु रीके आणि ऍलन यांना त्यांची खरी आई, लिंडा मॅकआरिटी यांना अधूनमधून भेट देण्याची परवानगी होती.
रीकेची आई दोन्ही मुलांना भेटायला प्रत्येक वर्षी क्रिसमसमध्ये यायची किंवा फोन करायची परंतु गेली 3 वर्ष तिने कोणत्याही प्रकारे आपल्या मुलांना कॉन्टॅक्ट केला नाही. ज्यामुळे रीके विचारात पडला.
रीके लिंडाबद्दल काहीच माहिती नव्हते, परंतु त्याला आता काहीही करुन आपल्या आईला भेटायचे होते. ज्यासाठी त्याने आपल्या आईला कसं शोधावं, यावर विचार करायला सुरुवार केली.
एकेरात्री रीके रात्री 2 वाजता लिंडाचा विचार करत Google चालवत होता. तेव्हा अचानक वाटले की, त्याने लिंडाला गुगलवर सर्च करावे. काहीतरी त्याला नक्कीच सापडेल आणि त्याने आपल्या आईला गुलवर सर्च केलं, तेव्हा त्याच्यासमोर धक्कादायक माहिती समोर आली.
2018 मध्ये आई लिंडा मरण पावल्याचे रीसला समजले. त्याच्या आईचा कोणीतरी खून केला होता. एका लेखात लिंडाबद्दल लिहिलेल्या गोष्टी वाचून रीके थक्क झाला. त्याला समजले की, त्याची आई ड्रग्स घेत होती आणि ड्रग्जच्या भांडणात दुसऱ्या एका व्यक्तीने त्याच्या आईचा खून केला. ज्यामुळे ती गेली 3 वर्ष आपल्या मुलांना भेटायला येऊ शकलेली नाही.