संबंध तोडण्याच्या अमेरिकेच्या धमकीला चीनचं प्रत्युत्तर

कोरोना व्हायरसच्या संकटात चीन आणि अमेरिका यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Updated: May 15, 2020, 09:01 PM IST
संबंध तोडण्याच्या अमेरिकेच्या धमकीला चीनचं प्रत्युत्तर title=

बीजिंग : कोरोना व्हायरसच्या संकटात चीन आणि अमेरिका यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीनसोबत संबंध तोडण्याची धमकी कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांच्या या धमकीला चीननेही प्रत्युत्तर दिलं आहे.

'चीन आणि अमेरिकेला कोरोनाविरुद्ध एकत्र येऊन ही लढाई जिंकली पाहिजे. रुग्णांवर उपचार केले पाहिजेत आणि अर्थव्यवस्था तसंच उत्पादन सुरू केलं पाहिजे. पण यासाठी अमेरिका आणि चीनने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. चीन आणि अमेरिकेचे चांगले संबंध दोन्ही देशांच्या हिताचे आहेत, तसंच जागतिक शांततेसाठीही अनुकूल आहेत,' असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले. 

महिला पत्रकराच्या त्या प्रश्नावर ट्रम्प संतापले, परिषद अर्ध्यातच सोडून गेले

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतचे संबंध पूर्णपणे संपवले जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया गुरुवारी दिली होती. फॉक्स बिजनेस न्यूजला ट्रम्प यांनी मुलाखत दिली. जर तुम्ही संपूर्ण संबंध तोडलेत तर ५०० बिलियन डॉलर वाचतील. मी सध्या जिनपिंग यांच्यासोबत बोलत नाही, असं ट्रम्प म्हणाले. 

कोरोनामुळे अमेरिकेत ८० हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

चौफेर टीकेनंतर चीनला या देशाची साथ, एकत्र बनवणार कोरोनावर लस