China Space Station: अवकाशातील अनेक गोष्टींबाबत संशोधन करण्यासाठी भारत, रशिया, अमेरिका, चीन या देशांकडून सातत्यानं विविध मोहिमा राबवण्यात येतात. अशा या मोहिमांच्या माध्यमातून अवकाशासंदर्भातील अनेक गुपितं अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या समोर आली आहेत आणि यापुढंही येत राहतील. त्यातच आता काही अशी दृश्य आणि अशी माहिती समोर येत आहे की पाहणारेही थक्क झाले आहेत.
पुन्हा एकदा अवकाश आणि अंतराळयात्री यांच्यासंदर्भातील चर्चा होण्याचं कारण आहे चीनची एक मोहिम फत्ते करून पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर आणि त्यांची झालेली अवस्था. उपलब्ध माहितीनुसार चीनचे तीन अंतराळवीर जवळपास 6 महिन्यांसाछी अवकाशात राहिल्यानंतर मंगळवारी पृथ्वीवर परतले. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या माहबितीनुसार जिंग हैपेंग, झू यांग्झू आणि गुई हाई चाओ गोबी हे अंतराळवीर वाळवंटानजीक असणाऱ्या जिओ क्वान सॅटेलाईट लाँच सेंटरपाशी एका रिटर्न कॅप्स्यूलमधून बाहेर पडले. यावेळी त्यांना पृथ्वीवर तोल सावरणंही कठीण झाल्याचं पाहायला मिळालं.
मुळात अवकाशात गुरुत्वाकर्षणाचे नियम आणि पृथ्वीवरी गुरुत्वाकर्षणाचं बळ यांमध्ये असणारी भिन्नता पाहता अनेक कारणांमुळं त्यांच्या शरीरामध्ये हे बदल दिसून येतात. ज्यामुळं या अंतराळवीरांना स्वत:च्या पायांवर उभं राहण्यासाठी वेळ जातो. इतकंच नव्हे, तर त्यांना पृथ्वीवर पोहोचल्यानंतर दैनंदिन आहार देण्यासही काही कालावधी लागतो. ज्यामुळं इथंही त्यांना पथ्यपाण्याचं पालन करावं लागतं.
दरम्यान, अंतराळवीरांचा हा गट पृथ्वीवर परतल्यानंतर अवकाशात जाण्यासाठी आता चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेतील अंतराळवीरांचा नवा गट तियांगोंग स्थानकावर पोहोतला असून, आता हा गट चाचण्या आणि परीक्षण प्रक्रीयेला सामोरा जाताना दिसणार आहे.
2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीलाच चीन चंद्रावर मानवाला पाठवण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे. किंबहुना या देशातून चंद्राच्या पृष्ठाचे काही नमुनेही पृथ्वीवर आणले असून, चंद्राच्या सुदूर भागावर त्यांनी रोवर उतरवलं आहे. इतक्यावरच न थांबता ब्रह्मांडाची खोली तपासण्यासाठीसुद्धा चीनकडून एक अद्ययावर दुर्बिण अंतराळात पाठवली जाणार आहे.