...म्हणून दहा वर्षाच्या मुलाने आईला गोळ्या घातल्या; कारण ऐकूण पोलिसही चक्रावले

विस्कॉन्सिन कायद्यानुसार, 10 वर्षांच्या मुलावर प्रौढ म्हणून गुन्हा दाखल केला जातो. या मुलाने केलेल्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता या फर्स्ट-डिग्री हेतुपुरस्सर हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार या मुलावर प्रौढांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: Dec 1, 2022, 04:49 PM IST
...म्हणून दहा वर्षाच्या मुलाने आईला गोळ्या घातल्या; कारण ऐकूण पोलिसही चक्रावले title=

Shocking News : एका दहा वर्षाच्या मुलाने आपल्या आईला गोळ्या घालून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात हत्येमागे जे कारण समोर आले ते ऐकून पोलिसही चक्रावले आहे. पोलिसांनी या लहान मुलाला ताब्यात घेतले आहे(Crime News). 

अमेरिकेतील स्थानिक वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. प्राथमदर्शनी या मुलाने चुकून बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, या मुलाने रागाच्या भरात आईला ठार करण्याच्या उद्देशानेच तिच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे उघडकीस आले. तपासादरम्यान आईचे हत्या करण्यामागे मुलाने सांगितलेले कारण ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला. 

आईने व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट विकत घेण्यास नकार दिल्याने मुलाने चिडून रागाच्या भरात आईला संपवले आहे. आईच्या बेडरुमध्ये असलेले पिस्तुल घेवून या मुलाने आईवर गोळ्या झाडल्या. 

विस्कॉन्सिन कायद्यानुसार, 10 वर्षांच्या मुलावर प्रौढ म्हणून गुन्हा दाखल केला जातो. या मुलाने केलेल्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता या फर्स्ट-डिग्री हेतुपुरस्सर हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार या मुलावर प्रौढांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या मुलाचे वकिल बाल न्यायालयात दाद मागू शकतात. सध्या या मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.