बांगलादेशातील सतखीरा येथे माँ कालीचे जेशोरेश्वरी मंदिर खूप प्रसिद्ध आहे. 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला भेट दिली तेव्हा त्यांनी त्या मंदिरात माँ कालीचा मुकुट अर्पण केला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेला हा मुकूट मंदिरातून चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी दुपारी मंदिरातून सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा मुकुट चोरीला गेला आहे.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही चोरांची ओळख पटवण्यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यादरम्यान 27 मार्च 2021 रोजी जेशोरेश्वरी मंदिराचा दौरा केला होता.
मामले पर स्थानीय पुलिस अधिकारियों ने बताया कि, 'हम चोर की पहचान करने के लिए मंदिर के सीसीटीवी फुटेज की जांच कर रहे हैं'। पीएम मोदी ने अपनी बांग्लादेश यात्रा के दौरान 27 मार्च, 2021 को जेशोरेश्वरी मंदिर का दौरा किया था। त्या दिवशी त्यांनी प्रतिकात्मक म्हणून देवीच्या डोक्यावर मुकुट घातला. 'जेशोरेश्वरी' या नावाचा अर्थ 'जेशोरची देवी' असा होतो.
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी माँ कालीच्या मुकुटाच्या चोरीच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. उच्चायोगाशी संबंधित लोकांनी सांगितलं की, बांगलादेशातील मंदिरातून धार्मिक वस्तू चोरीला गेल्याच्या घटनेवर भारताने चिंता व्यक्त केली आहे आणि बांगलादेशच्या तपास यंत्रणांकडे या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालय तपास यंत्रणांच्या संपर्कात आहे.
पिढ्यानपिढ्या मंदिराची देखभाल करणाऱ्या कुटुंबातील सदस्य ज्योती चट्टोपाध्याय यांनी बांगलादेशी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, मुकूट चांदी आणि सोन्याने मढवलेला होता. चोरीला गेलेला मुकूट भाविकांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाचा आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये, जेशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि शेजारील देशांमध्ये पसरलेल्या 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.
असं मानलं जातं की, सातखीरा येथील ईश्वरीपूर येथे असलेले हे मंदिर 12 व्या शतकाच्या उत्तरार्धात अनारी नावाच्या ब्राह्मणाने बांधले होते. त्यांनी जशोरेश्वरी पीठासाठी 100 दरवाजे असलेले मंदिर बांधले. नंतर 13व्या शतकात लक्ष्मण सेनने त्याचा जीर्णोद्धार केला आणि शेवटी राजा प्रतापादित्याने 16व्या शतकात मंदिराची पुनर्बांधणी केली.
बांगलादेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारत मंदिरात बहुउद्देशीय कम्युनिटी हॉल बांधणार आहे. ते म्हणाले की, स्थानिक लोकांसाठी सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांसाठी ते उपयुक्त ठरेल आणि त्याच वेळी चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या वेळी सर्वांसाठी निवारा म्हणूनही काम करेल.