इराणच्या पूर्व भागात जोरदार भूकंप

इराणच्या पूर्व भागात  भूकंपाचे दोन जबर धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक बसलेल्या या भूकंपांपैकी पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर सहा इतकी होती. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 2, 2017, 11:10 AM IST
 इराणच्या पूर्व भागात जोरदार भूकंप title=

केरमन : इराणच्या पूर्व भागात  भूकंपाचे दोन जबर धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक बसलेल्या या भूकंपांपैकी पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर सहा इतकी होती. 

या भूकंपाचा केंद्रबिंदू केरमन शहराजवळ होता, असी माहिती अमेरिकेच्या भूगर्भ शास्त्रज्ज्ञांनी दिली. तर दहा मिनिटांनी झालेल्या दुस-या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर पाच इतकी होती. या भूकंपामुळं जीवीत आणि प्राणहानी झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

दोन आठवड्यांपूर्वी तेहरानमध्ये झालेल्या भूकंपात सुमारे ४०० लोकांचे बळी गेले होते.