मुंबई : गर्लफ्रेंड (girl friend) आणि बॉयफ्रेंडसाठी (Boyfriend) जगात ब्रेकअपपेक्षा मोठं दु:ख नाही. रिलेशनशीपच्या (Relationship) सुरुवातीला सर्व गुडीगुडी सुरु असतं. रिलेशनशीपला 6 महिने, वर्ष यशस्वीपणे पूर्ण होतात. या दरम्यान दोघांकडून एकमेकांना भरमसाठ गिफ्ट दिले जातात. दोघांचं एकमेकांवरचं प्रेम उतू जातं. पण एखाद दिवशी दोघांमध्ये वाद निर्माण होतो अन तो इतका टोकाला जातो की, ब्रेकअपशिवाय पर्याय नसतो. ब्रेकअपनंतर दोघेही विरहात जातात. मित्रांजवळ एकमेकांची बदनामी करु लागतात. एकमेकांना दिलेले गिफ्ट परत घेतात. पण सर्वच असे नसतात. काही त्या गिफ्टची चांगलीच विल्हेवाटही लावतात. आतापर्यंत तुम्ही ब्रेकअप झाल्यानंतर लव्ह लेटर वगैरे जाळल्याचं ऐकलं किंवा पाहिलं असेल. पण एका एक्स गर्लफ्रेंडने त्याच्या एक्स बॉयफ्रेंडला आपल्या पैशाने गिफ्ट दिलेल्या 23 लाखांच्या महागड्या बाईकला (Expensive Bike) आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. (Ex girlfriend sets fire to Rs 23 lakh expensive bike she gave as gift to her ex boyfriend)
नक्की काय घडलं?
घटना आहे थायलंडची. ब्रेकअपचा वचपा घेण्यासाठी एक्सने बाईकला आग लावल्याचं समजतंय. या 36 वर्षीय एक्सने त्याच्या एक्स बॉयफ्रेंडच्या बाईकला आग लावल्याचा व्हीडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या एक्सचं नाव कनोक वान (Kanok Wan) आहे. कनोकने बाईक जाळण्यासाठी पेट्रोलचा वापर केला. एक्स बॉयफ्रेंडने बाईक कुठे ठेवलीय, याची माहिती घेतली. सर्व नियोजन केलं. त्यानंतर पार्किंगमध्ये ठेवलेल्या बाईकवर पेट्रोल ओतून बाईक पेटवून दिली. त्यानंतर कनोक तिथून निघून जाते.
पण बाईक पेटवणं हे कनोकला चांगलंच महागात पडलंय. LadBible च्या रिपोर्टनुसार, एक्स बॉयफ्रेंडच्या बाईकला आग लावताना इतर 6 गाड्या आगीच्या संपर्कात आल्याने त्यांनीही पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. तसेच अग्निश्मन दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी LadBible च्या हवाल्याने म्हटलं की, "श्रीनाखरिनवीरोट युनिव्हर्सिटी प्रसारमित डेमॉन्स्ट्रेशन (Srinakharinwirot University Prasarnmit Demonstration School) शाळेतील पार्किंग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची सूचना आम्हाला मिळाली. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थी नव्हते. त्यामुळे सुदैवाने मोठा प्रकार टळला".
सीसीटीव्हीच्या मदतीने अटक
दरम्यान कनोकला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अटक करण्यात आली आहे. कनोकची शालेय कर्मचाऱ्याची एक्स गर्लफ्रेंड अशी ओळख झाली आहे. तसेच पोलिसांकडून तिची कसून चौकशी केली जात आहे.
संबंधित बातम्या :
लग्नात सातवा फेरा बाकी असताना नवरी म्हणाली... 'मला लग्नच करायचं नाही'