तुरुंगात लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू

 Fire prison :  तुरुंगात बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग भडकली. या आगीत किमान 40 लोकांचा होरपळून बळी गेला आहे.  

Updated: Sep 8, 2021, 10:49 AM IST
तुरुंगात लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू title=

जकार्ता : Fire at overcrowded Indonesian prison : इंडोनेशियाच्या बॅन्टेन प्रांतातील तुरुंगात बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग भडकली. या आगीत किमान 40 लोकांचा होरपळून बळी गेला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सरकारी प्रवक्त्याने दिली आहे.

टेंगरंग कारागृहाची क्षमता 1 हजार 225 कैदी ठेवण्‍याचीच होती. मात्र, यामध्‍ये दोन हजारांहून अधिक कैदी होते. कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या तुरुंग विभागाच्या प्रवक्त्या रिका अप्रिअंती यांनी सांगितले की, टेंगरंग कारागृह ब्लॉक सी येथे पहाटे सुमारास मोठी आग लागली. आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

या ब्लॉकमध्ये कैद्यांना ड्रग्जशी संबंधित गुन्ह्याप्रकरणी ठेवण्यात आले होते आणि त्यात 122 लोकांची क्षमता होती, असे त्या म्हणाल्या. आग लागली तेव्हा किती लोक उपस्थित होते, याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाही. परंतु तुरुंगात गर्दी झाल्याचा त्यांनी दुजोरा दिला आहे.

शॉर्टसर्कीटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे,  एका पोलिसांने मेट्रो टीव्हीला सांगितले, ज्याने पोलीस अहवालाचा हवाला देत सांगितले की 73 लोक जखमी झाले आहेत. आगीच्‍या दुर्घटनेनंतर कारागृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात केला आहे. इंडोनेशियामधील कारागृहांमध्‍ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्‍यामुळे येथील कारागृहांमध्‍ये कैद्‍यांमध्‍ये धुमश्‍चक्री आणि आग लागण्‍याची घटना नेहमी घडत असतात. आगीची दुर्घटना घडलेल्‍या कारागृहात मोठ्या संख्‍येने ड्रग्ज पदार्थाच्‍या गुन्‍ह्यातील आरोपींना ठेवण्‍यात आले होते.