भाजप पुन्हा सत्तेत आलं तर शांती वार्ता होऊ शकते - इम्रान खान

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर शांती वार्ता शक्य...

Updated: Apr 10, 2019, 09:33 AM IST
भाजप पुन्हा सत्तेत आलं तर शांती वार्ता होऊ शकते - इम्रान खान title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर काश्मीरबाबत काहीतरी तडजोड होऊ शकेल असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे. काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर काश्मीरबाबत सहमती होण्याची काहीच शक्यता नाही असं खान यांना वाटतं आहे. भाजप जिंकलं तर काश्मीरबाबत काही तडजोड होण्याची शक्यता अधिक आहे असं खान यांनी म्हटलं आहे. भारतात मुस्लीम समाजाची अवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे असं देखील इम्रान खान यांनी म्हटलंय. भीती आणि राष्ट्रवाद यांच्या जोरावर मोदी सरकार सत्तेत राहू पाहात आहे असं देखील इम्रान म्हणाले.

इम्रान खान यांनी म्हटलं की, इस्राईलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या प्रमाणे मोदी भीती आणि राष्ट्रवादाची भावना जागवून निवडणूक जिंकू इच्छितात. भाजपने काश्मीरमध्ये तो कायदा बदलण्याचा आश्वासन दिलं आहे ज्यामुळे काश्मीरमध्ये बाहेरच्या व्यक्ती देखील जागा घेऊ शकेल.

इम्रान खान म्हणतात की, 'पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. यासाठी आम्हाला पाक आर्मीची मदत होईल. काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना संपवण्यात येईल.'

पाकिस्तानमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर निवडणूका लढवल्या जातात. इम्रान खान यांनी मागच्या वर्षी सत्ता स्थापन केली. फेब्रुवारीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढला होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट होती. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होत होती. त्यानंतर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते.