भारत बनला ऑस्ट्रेलिया समुहाचा सदस्य, चीनला धक्का

भारत अणू पुरवठादार समुह म्हणजेच एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहे. त्यातच भारताला मोठं यश मिळालं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 20, 2018, 09:42 AM IST
भारत बनला ऑस्ट्रेलिया समुहाचा सदस्य, चीनला धक्का

नवी दिल्ली : भारत अणू पुरवठादार समुह म्हणजेच एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहे. त्यातच भारताला मोठं यश मिळालं आहे.

भारताला मोठं यश

भारत आता ऑस्ट्रेलिया ग्रूपचा सदस्य बनला आहे. हा समूह रासायनिक आणि जैविक घटकांच्या निर्यातवर नियंत्रण ठेवतो. जे रासायनिक किंवा जैविक शस्त्र बनू शकत नाही. अशी अपेक्षा आहे की या यशामुळे भारताच्या सार्वत्रिक प्रगतीचा दर्जा वाढेल. याबरोबरच, अणू पुरवठादार ग्रुप (एनएसजी) मध्ये सदस्यत्वासाठी भारताचा दावा देखील मजबूत केला जाईल. ज्यामध्ये चीन अडथळा निर्माण करतो आहे.

अमेरिका, फ्रांन्सची मदत

ऑस्ट्रेलिया ग्रुप एक अनौपचारिक संस्था आहे. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा समावेश आहे. अमेरिका आणि फ्रान्स यांनी या समूहात भारताला सदस्य करावं यासाठी प्रयत्न करत होता. भारताकडून निर्यात केल्या जाणा-या लष्करी उपयोगासाठी वापरल्या जाणा-या वस्तूंमध्ये सर्वाधिक रसायने आहेत. परंतू त्याची देखरेख करण्यासाठी देखील येथे एक उत्तम व्यवस्था आहे. आता या गटात प्रवेश मिळविल्यानंतर, भारताला रासायनिक व जैविक घटकांच्या जागतिक व्यापारात हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल. भारताचे फ्रान्समधील राजदूत अलेक्झेंडर जेगलर यांनी भारतीय कूटनीतीच्या यशाचे शुक्रवारी अभिनंदन केले.

भारताची ताकद वाढणार

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, भारत वासेनार व्यवस्थेचा सदस्य झाला होता. या व्यवस्थेचा उद्देश पारंपारिक शस्त्रे यांच्यासह त्या वस्तू आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी पारदर्शकता व जबाबदारी आणणे हा आहे, ज्याचा उपयोग लष्कराद्वारे केला जाऊ शकतो. जून 2016 मध्ये भारत मिसाइल टेक्नॉलजी कंट्रोल रिजीम (MTCR)चा सदस्य बनला. जे क्षेपणास्त्र, यु.ए.व्ही आणि संबंधित तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्यांवर नजर ठेवतात. यानंतर आता भारताला आणखी उच्च प्रतीचे मिसाईल टेक्निक मिळवण्यासाठी मदत होईल.