पंतप्रधान मोदी आणि चिमुरड्या मोशेच्या भेटीची उत्सुकता

इस्रायलमध्ये अनेकांची मोदींना भेटण्याची इच्छा आहे... पण या सगळ्यात खास ठरणार आहे ती मोदी आणि चिमुरड्या मोशेची भेट...

Updated: Jul 5, 2017, 04:57 PM IST
पंतप्रधान मोदी आणि चिमुरड्या मोशेच्या भेटीची उत्सुकता title=

नवी दिल्ली : इस्रायलमध्ये अनेकांची मोदींना भेटण्याची इच्छा आहे... पण या सगळ्यात खास ठरणार आहे ती मोदी आणि चिमुरड्या मोशेची भेट...

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोदींचं दिलदारपणे स्वागत केलं... पण, मोदींना भेटण्यासाठी इस्त्रायलमधला आणखी एक चिमुरडाही उत्सुक आहे.

पंतप्रधान मोदी आणि ११ वर्षांचा मोशे यांची भेट महत्त्वाची ठरतेय. मोशेला भेटण्याची एवढी उत्सुकता का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नऊ वर्षं मागे जावं लागेल. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. बेबी मोशे आणि त्याचे इस्त्रायली आई-वडील मुंबईच्या नरीमन हाऊसमध्ये राहात होते. २६ नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊसला लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात १७३ लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बेबी मोशेचे आई-वडीलही होते. त्यावेळी दोन वर्षांच्या मोशेला त्याला सांभाळणाऱ्या सैंड्रा सैम्युअल या महिलेनंवाचवलं. 

२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात मोशेनं त्याचे आई वडील गमावले. मोशेच्या आई - वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचे आजी-आजोबा मोशेला इस्रायलला घेऊन गेले. मोशेला सांभाळणारी सँड्रा सॅम्युअलही इस्त्रायलला गेली... तिनं स्वतःच्या मुलासारखं मोशेला सांभाळलंय. 


नऊ वर्षांचा मोशे

२६/११ च्या घटनेनंतर मोशेला इस्त्रायलचं नागरिकत्व देण्यात आलं. सँड्रालाही दोन वर्षांनंतर इस्रायलचं नागरिकत्व दिलं गेलं.  तसंच सँड्रानं दाखवलेल्या धैर्याबद्दल तिचा इस्त्रायलमध्ये सन्मानही करण्यात आला. मोशेचं भारताबरोबर एक वेगळं नातं आहे... त्याला दुःखाची किनार असली तरी मोशेला भेटून त्याचं दुःखं हलकं करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे.